AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WT20 WC Final: ऑस्ट्रेलिया सातव्यांदा ठरला चॅम्पियन, इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलिायने इंग्लंडला 6 गडी राखून पराभूत केलं. यासह सातव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

WT20 WC Final: ऑस्ट्रेलिया सातव्यांदा ठरला चॅम्पियन, इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव
WT20 WC Final: ऑस्ट्रेलिया सातव्यांदा ठरला चॅम्पियन, इंग्लंडचा पराभवImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Jul 05, 2026 | 11:17 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 150 धावांवर रोखलं. इंग्लंडने 20 षटकात 4 गडी गमवून 150 धावा केल्या आणि विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज गाठलं. ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमवून दिलेलं आव्हान गाठलं. यासह वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सातव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

ऑस्ट्रेलियाचा डाव

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 17 धावांवर पहिला धक्का बसला. जॉर्जिया व्होल 9 धावा करून तंबूत परतली. तर बेथ मूनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी आश्वासक भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी इंग्लंडला चांगलंच झुंजवलं. दुसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 81 धावांची भागीदारी केली. फोबी लिचफिल्ड 35 चेंडूत 48 धावा करून बाद झाली. बेथ मूनी 49 चेंडूत 64 धावांची खेळी करून बाद झाली.

इंग्लंडचा डाव

अंतिम सामन्यात इंग्लंडची सुरूवात काही खास झाली नाही. एमी जोन्स आणि डॅनी वायट-हॉज हे आघाडीचे फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले. एमी जोन्सने 6 चेंडू 6 धावा, तर डॅनी वायट-हॉजने 9 चेंडू 8 धावा करून बाद झाली. त्यानंतर नॅट सायव्हर ब्रंट आणि एलिस कॅप्सी यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. एलिक कॅप्सी 23 धावा करून तंबूत परतली. तर हेदर नाइट काही खास करू शकली नाही. तिचा डावही 2 धावांवर आटोपला. त्यानंतर फ्रेया कॅम्पने 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. तर नॅट सायव्हर ब्रंटने 53 चेंडूत नाबाद 58 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, सोफी मोलिनेक्स आणि एनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

बक्षिसाची रक्कम

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. त्यामुळे जेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला 2.34 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 22 कोटी रुपये मिळाले आहेत. तर उपविजेत्या इंग्लंड संघाची पराभूत झाल्यानंतरही चांदी झाली आहे. इंग्लंड 1.17 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 11 कोटी रोख रक्कम मिळाले आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...