AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक लांब असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शिलेदारात-दावे-प्रतिदावे

धाराशिव लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेनेत उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत,

लोकसभा निवडणूक लांब असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शिलेदारात-दावे-प्रतिदावे
eknath shinde
| Updated on: Nov 23, 2026 | 10:53 PM
Share

अजून लोकसभा निवडणूकींना अवकाश असताना आता पासूनच धाराशिव लोकसभा निवडणूकीवर शिवसेनेत दावे आणि प्रतिदावे सुरु झाले आहेत. या संदर्भात महायुतीतील शिवसेना पक्षात यावरुन हमरी तुमरी सुरु झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानदार चौगुले यांनी पक्षाने यंदा मला तिकीट दिले तर आपण शंभर टक्के खासदारकीची निवडणूक लढवू असे आव्हान दिले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार शिवसेनेचा असताना त्यांनी असे वक्तव्ये केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर सध्याचे लोकसभा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना टोला मारला आहे.

धाराशिव लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेनेत उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ओमराजे निंबाळकरांना थेट आव्हान दिले आहे. या संदर्भात ज्ञानराज चौगुले म्हणाले की, पक्षाने तिकीट दिले तर १०० टक्के खासदारकी लढवणारच असे आव्हान दिल्याने दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा आतापासूनच जुंपली आहे. परंतू आता एकनाथ शिंदे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ गाळतात हा येणार काळ ठरवणार आहे.

विद्यमान खासदार शिवसेनेचे असताना शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण १०० टक्के लोकसभा निवडणूक लढवणार असे वक्तव्य केले आहे.त्यांच्या या विधानामुळे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना माजी आमदार चौगुले यांनी एक प्रकारे राजकीय आव्हानच दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी या विधानावर अत्यंत विचारपूर्वक प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षातील एकसंगता आणि एकवाक्यता काय आहे, हे तुम्हाला २०२९ ची निवडणूक लागल्यानंतर दिसून येईल, असं म्हणत त्यांनी पक्षातील एकजुटीचा विश्वास व्यक्त केला. मात्र, ज्ञानराज चौगुले यांच्या उमेदवारीच्या इच्छेवर बोलताना ओमराजेंनी मिश्किल टोला लगावला. ‘मला उद्या अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे, मग तुम्ही मला अडवणार का?’ असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू