AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात २८ लाखाहून अधिक मतदार ‘यादीबाहेर’, निवडणुक विभागाची ३० नोव्हेंबरपर्यंत शेवटची संधी.

अर्ज जमा न झालेल्या मतदारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता बीएलओशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

ठाण्यात २८ लाखाहून अधिक मतदार ‘यादीबाहेर’, निवडणुक विभागाची ३० नोव्हेंबरपर्यंत शेवटची संधी.
thane collector pc
| Updated on: Nov 23, 2026 | 10:08 PM
Share

ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात तब्बल २८ लाख ६० हजार २६६ मतदारांचे गणना अर्ज जमा न झाल्याने त्यांची नावे मतदार यादी बाहेर आहेत. मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, पत्ता न सापडलेले, अनुपस्थित आणि नकार दर्शविलेले अशा लाखो मतदारांची नावे वगळलेल्या मतदारांच्या वर्गवारीत गेली आहेत. मात्र, मतदारांसाठी अद्याप संधी संपलेली नाही. आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत गणना अर्ज आणि आवश्यक परिशिष्ट सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता निवडणूक विभागाने बीएलओ सोबतच व्हॉट्सॲप, ई-मेल आणि एसएमएसचाही आधार घेतला आहे.

ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने गणना अर्ज जमा न झाल्याचे चित्र समोर आले असून, ही बाब निवडणूक प्रशासनासाठी चिंतेची ठरली आहे. एसआयआर प्रक्रियेत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यातील २८ लाख ६० हजार २६६ मतदारांचे गणना अर्ज वगळलेल्या मतदारांच्या वर्गवारीत नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये तब्बल २ लाख २२ हजार ७०६ मतदारांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे १७ लाख ८ हजार ४५ मतदारांचा पत्ता सापडलेला नाही किंवा ते संबंधित ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळले आहे. याशिवाय ७ लाख ३५ हजार १४४ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्य ४१ हजार ३३ मतदारांनी गणना प्रपत्र भरण्यास नकार दर्शविला आहे. यापैकी १ लाख ५३ हजार ३३८ मतदारांची आधीच नोंदणी झाली आहे. गणना अर्जांचे वितरण आणि संकलन करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज जमा न झालेल्या मतदारांनी आपली नोंद तपासून बीएलओशी संपर्क साधावा आणि आवश्यक अर्ज आणि परिशिष्टांसह कागदपत्रे सादर करावीत. असे निवडणुक विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान, मतदारांनी केवळ निवडणुकीच्या वेळी मतदानाचा हक्क बजावण्यापुरते मर्यादित न राहता, आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची आताच खात्री करणे गरजेचे आहे. अर्ज जमा न केलेल्या मतदारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता बीएलओशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

 २२ डिसेंबरला अंतिम मतदार यादी

एसआयआर प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. १० डिसेंबर पर्यंत गणना अर्ज निकाली काढण्याचे नियोजन असून त्यानंतर नोटीस देऊन दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अखेर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू