AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

| Updated on: Nov 23, 2026 | 1:37 PM
Share

शिंदे गटाच्या बंडखोरीदरम्यान एका आमदाराचे राम नाम सत्य होणार होते, असा खळबळजनक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. यावर काँग्रेस आमदार कैलास पाटील यांनी आपणच ते आमदार असून शिरसाट यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी राजकारण कोणत्या थराला जाऊ शकते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात शिंदे गटाच्या बंडखोरीच्या वेळी एका आमदाराचे राम नाम सत्य (जीवघेणे संकट) होणार होते, असा धक्कादायक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिरसाट यांच्या मते, सुरतकडे जात असताना तो आमदार त्यांच्या गटातून निसटला होता आणि त्यावेळी काही अघटित घडण्याची शक्यता होती. मात्र, शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने त्याला जाऊ दिले. “एखादे अघटित घडले असते, तर त्याचा परिणाम आमच्यावर झाला असता, म्हणून आम्ही काळजी घेतली होती”, असे शिरसाट म्हणाले.

शिरसाट यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस आमदार कैलास पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले की, सुरतवरून परत आलेला आमदार मीच होतो. त्यांनी शिरसाट यांना आव्हान देत कुणाचे राम नाम सत्य होणार होते आणि कुणाला थांबवले होते, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. सत्ता आणि खुर्ची मिळवण्यासाठी राजकारण कोणत्या स्तराला जाऊ शकते, हे या घटनेतून समोर आले आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे.

Published on: Nov 23, 2026 01:37 PM

Follow Us