Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार…
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी ४ ते ९ डिसेंबर दरम्यान नागपूर विधान भवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शेगावपासून सुरू होणारा हा मोर्चा अधिवेशनापर्यंत पोहोचेल. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत, रोहित पवारांच्या भूमिकेला राजकीय म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी ४ ते ९ डिसेंबर दरम्यान नागपूर येथील विधान भवनावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या आवाजाला बुलंद करण्यासाठी हा मोर्चा शेगाव, बुलढाणा येथून सुरू होऊन विधानसभेच्या अधिवेशनापर्यंत पोहोचणार आहे.
या घोषणेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी रोहित पवारांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, “सरकार चर्चेसाठी तयार आहे, त्यांनी आपली बाजू मांडावी. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे सकारात्मक आहे.” त्याचबरोबर, त्यांनी या मोर्चाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत रोहित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीकाही केली. “रोहित पवारांनी मोर्चा काढला म्हणजे तो राजकीय आहे. खोटं बोला, पण रेटून बोला असं चालू आहे. काहीही गर्दी दिसली की लगेच घुसून जातात,” असे विधान बावनकुळे यांनी केले.
Published on: Nov 23, 2026 12:42 PM
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...

