AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार-खासदार पळाले, मुख्यालयावर ताबा, आता ममतांचे २८ वर्षे जुने निवडणूक चिन्ह जाणार ?

तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नाव, चिन्ह आणि पक्ष संघटनेवरील नियंत्रणावरून ममता बॅनर्जी आणि बंडखोर गट यांच्यातील लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. दोन्ही बाजू सोमवारी निवडणूक आयोगासमोर आप-आपले दावे सादर करणार आहेत.

आमदार-खासदार पळाले, मुख्यालयावर ताबा, आता ममतांचे २८ वर्षे जुने निवडणूक चिन्ह जाणार ?
mamta banerjee
| Updated on: Jul 05, 2026 | 10:28 PM
Share

देशात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत जे झाले ते आता बंगालमध्ये टीएमसीबाबत होत आहे. तृणमूल कांग्रेस (TMC) पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि संघटनेवर नियंत्रणाची लढाई आता निर्णायक मोडवर पोहचले आहे.सोमवारी ममता बॅनर्जी आणि बंडखोर गट निवडणूक आयोगाच्यासमोर आप-आपले दाव्यांचे समर्थन करण्यासाठी दस्तावेज आणि पुरावे सादर करणार आहेत. पक्षाच्या २८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले आहे क दोन गट आपण खरी टीएमसी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात मोठा प्रश्न आमदार आणि खासदार फुटल्यानंतर आता ममता यांच्या हातातून पक्ष जाण्याचाही धोका बनला आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी सायं.५.३० वाजेपर्यंत संघटनेशी संबंधित कागदपत्रे, रेकॉर्ड आणि समर्थनार्थ पुरावे जमा करण्यास म्हटले होते. गेल्या आठवड्यात आयोगाने दोन्ही गटांची सुरुवातीचा युक्तीवाद ऐकून घेतला होता. वादाचा सर्वात मोठा मुद्दा टीएमसीचे प्रसिद्ध गवत आणि फुलाचे निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव, संघटना,संपत्ती, निधी आणि कोलकाता स्थित मुख्यालय ‘तृणमूल भवन’ यावर नियंत्रण कोणाचे असणार हा आहे.

ममता बॅनर्जीचा कालीघाट गट पक्षाची स्थापना, संघटनात्मक निरंतरता आणि कार्यकर्त्यांचे समर्थनला आपला सर्वात मोठा आधार सांगत होता. तर बंडखोर गटाचा दावा आहे की त्यांच्या सोबत सर्वाधिक आमदार आणि लोकप्रतिनिधी असल्याचे खरी टीएमसी आमचीच आहे. एवढेच नाही तर खंडखोर गटाने टीएमसी भवनावर देखील टाळा लावला होता, घर मालकाने हा टाळा उघडला.

ममता vs बंडखोर गटात संघटनेवर ताब्यासाठी लढाई

पार्टीत संकट विधानसभा निवडणूकीतील पराजयाने सुरु झाले होते. आधी हे आमदारांच्या बंडखोरीपर्यंत मर्यादीत होते. परंतून नंतर संघटनेवर कब्जाच्या लढाईत बदल झाला. गेल्या महिन्यात बंडखोर गटाने विशेष बैठक बोलावून ज्येष्ठ आमदार अरुप रॉय यांना अध्यक्ष म्हणून निवडले आणि समांतर राष्ट्रीय नेता म्हणून घोषणाही केली.

खंडखोर गटाचा दावा आहे की त्यांच्यासोबत ८० पैकी ६५ आमदार आहेत. तर २१ लोकसभा खासदारांनी देखील त्यांच्या सोबत येण्याचा दावा केला आहे. ज्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या राजकीय स्थितीला मोठा झटका लागला आहे. शुक्रवारी बंडखोर गटाने कोलकाता येथील तृणमूल भवनावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. तेथील टाळे बदलण्यात आले आहे. नवीन पोस्टर्स लावण्यात आले आणि घोषणा करण्यात आली की आता पार्टीचे संचलन येथूनच होणार आहे.

निवडणूक आयोग पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून घेणार नाही – ममता बॅनर्जी

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांचे दावे फेटाळून लावले आणि निवडणूक आयोग पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून घेणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मला निवडणूक चिन्हाची चिंता नाही. मला माहीत आहे की ते ते काढून घेऊ शकणार नाहीत.जरी त्यांनी तसा प्रयत्न केला, तरी मी गळ्यात निवडणूक चिन्ह घालून लोकांमध्ये जाईन.” बंडखोर नेत्यांनी भाजपच्या सांगण्यावरून पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

बहुमत, संघटनात्मक रेकॉर्ड आणि कायदेशीर बाबींच्या आधारावर खरा टीएमसी पक्ष कोणाला मानावा, हे ठरवणे हे आता निवडणूक आयोगापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आयोगाचा निर्णय केवळ पक्षाच्या निवडणूक चिन्हापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो टीएमसीची राजकीय ओळख, मालमत्ता आणि भविष्यातील दिशा देखील निश्चित करणारा ठरणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा