AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची संपूर्ण प्रॉपर्टी… निलेश राणे यांचं गुणरत्न सदावर्तेंना थेट आव्हान; चॅलेंज स्वीकारणार?

निलेश राणे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून थेट आव्हान दिले आहे. सदावर्ते यांनी शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, या दाव्यावर राणे यांनी 'शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर माझी सर्व प्रॉपर्टी सोडून देईन' असे म्हटले आहे. सदावर्ते हे आव्हान स्वीकारतात का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

तुमची संपूर्ण प्रॉपर्टी... निलेश राणे यांचं गुणरत्न सदावर्तेंना थेट आव्हान; चॅलेंज स्वीकारणार?
gunratna sadawarteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 2:08 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणारच नाही, असा दावा प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सदावर्ते यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. शिंदे सेनेचे नेते, आमदार निलेश राणे यांनी सदावर्ते यांना थेट आव्हानच दिलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, झाले तर माझी संपूर्ण प्रॉपर्टी सोडून देतो, असं लिहून द्या, असं आव्हानच निलेश राणे यांनी सदावर्ते यांना दिलं आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते हे आव्हान स्वीकारतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निलेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना गुणरत्न सदावर्ते यांना चांगलंच घेरलं. एकनाथ शिंदे 2022 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्याआधीही लोक हेच म्हणायचे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. पण झाले. भविष्यवाणी सांगून महाराष्ट्र चालतो का? आज आमच्याकडे खासदार, आमदार, शेकडो नगरसेवक आहेत, अशा परिस्थितीत नेता मुख्यमंत्री होणार नाही तर कधी होणार? महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आमची शिवसेना आहे. मुख्यमंत्री होणारच नाहीत असे कोणी सांगितले तर लिहून द्या, नाही झाले तर आमची सगळी प्रॉपर्टी सोडून देतो, असंही लिहून द्या, असं आव्हानच निलेश राणे यांनी दिलं आहे.

फडणवीस नेते, पण…

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा आहे. त्यांनी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ निभावला आहे. परत एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. देवेंद्र फडणवीस वरच्या स्तरावर आहेत. मी एक कार्यकर्ता, शिवसैनिक म्हणून सांगतोय. फडणवीस पण माझे नेते आहेत, पण शिवसैनिक म्हणून मला वाटते शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत, असं निलेश राणे म्हणाले.

राज ठाकरेंना टोला

देवेंद्र फडणवीस यांना 2029 पर्यंत तरी राज्यात ठेवा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरही निलेश राणे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांचा फार मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे अनेक नगरसेवक, अनेक आमदार, अनेक खासदार आहेत. इतर राज्यांमध्येही त्यांची मनसे नावाची फार मोठी संघटना आहे. म्हणून भविष्यवाणी सांगायची आहे की नाही, याबद्दल आम्हाला विचार करावा लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.

सगळे रिकाम टेकडे

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनही त्यांनी टोलेबाजी केली. निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन आणि आंदोलनाची आयडिया ही ठाकरेंची नाही. अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची आहे. यांनी ती आयडिया चोरली. यांच्याकडे आता काम कुठे आहे? सगळे रिकाम टेकडे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?