AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रोहित पवार लबाड लांडगा…मुख्यमंत्र्यांजवळ…’;उजनी रक्षण आंदोलनावरून भाजप आमदारांची जहरी टीका

उजनी रक्षण आंदोलनावरून भाजप आमदार देवे्ंद्र कोठे यांनी जहरी टीका केली आहे. रोहित पवारांना लबाड लांडगा म्हणत त्यांनी टीका केली आहे.

'रोहित पवार लबाड लांडगा...मुख्यमंत्र्यांजवळ...';उजनी रक्षण आंदोलनावरून भाजप आमदारांची जहरी टीका
solapur newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 2:16 PM
Share

उजनी जलाशयात उभारणाऱ्या एआय डेटा सेंटरवरून सोलापुरात दोन गट पडले आहेत. एका आंदोलनात आमदार रोहित पवारांनी उडी घेतली आहे. दर एआय डेटा सेंटरच्या समर्थनार्थ भाजपने नारा दिला. सोलापुरात एआय डेटा समर्थनार्थ आंदोलनाची धुरा आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनी हाती घेतली आहे. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनावेळी भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार लबाड लांडगा असल्याचे म्हणत शेतकऱ्यांच्या हिताचं सोंग करत असल्याची टीका आमदार कोठे यांनी केली.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, ‘रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे. रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा ढोंग करतोय शेतकऱ्यांच्या हिताचा सोंग करतोय. या व्यक्तीला शेतकऱ्यांचा कधीही हित पाहिलेलं नाहीये. कायम स्वतःच्या राजकारणी महत्वकांक्षी पोटी आंदोलनजीवी भूमिका घेऊन मागच्या सहा महिन्यात वर्षभरात महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आमदार रोहित पवार आंदोलन करतात’.

‘सोलापुरात एक म्हण आहे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना… रोहित पवार तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, सोलापूरच्या विकासाच्या प्रकल्पामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका. आमच्या सोलापूर शहराच्या पाण्याची तुम्ही काळजी करू नका.  नऊ टक्के फक्त सोलार असल्यामुळे मासेमारीचे कुठलेही नुकसान होणार नाही. भारतात प्रत्येक ठिकाणी डेटा सेंटर यशस्वी झालेला आहे. ज्या ठिकाणी सोलर पॅनल बसवले आहेत, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ओरड नाहीये.  केवळ स्वतःची महत्त्वकांक्षा, मीडिया आणि आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या जवळ जाऊन बसण्याची संधी मिळण्यासाठी रोहित पवार शेतकऱ्यांना पुढे करून हाच स्टंट करत आहेत. या प्रकल्पाबाबत रोहित पवार आणि त्यांच्या माध्यमातून मोठा नरेटिव्ह पसरवण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 40 ते 42000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे, असा दावा आमदार देवेंद्र कोठे यांनी केला.

Follow Us
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत