AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 4000 रुपये, हादरवणारी माहिती समोर; सामान्यांना फुटला घाम!

भारतात येणाऱ्या पीएनजी, एलपीजीच्या तुटवड्यामुळे भारतात घरगुती गॅस सिलिंडर, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचा भाव थेट 60 रुपयांनी वाढला आहे.

धक्कादायक! गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 4000 रुपये, हादरवणारी माहिती समोर; सामान्यांना फुटला घाम!
lpg gas cylinderImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2026 | 9:24 PM
Share

Iran Israel War Cylinder Price : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात काही भारतीयांचाही समावेश आहे. परंतु या युद्धाने संपूर्ण जगाला उर्जासंकटाच्या खाईत लोटलं आहे. या उर्जासंकटाचे चटके आता भारतालाही बसत आहेत. आखाती देशांतून भारतात येणाऱ्या पीएनजी, एलपीजीच्या तुटवड्यामुळे भारतात घरगुती गॅस सिलिंडर, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचा भाव थेट 60 रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल व्यावसाय बंद पडले आहेत. असे असतानाच आता हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे. एक गॅस सिलिंडर चक्क 4000 रुपयांनी विकला जातोय.

नेमकी काय माहिती समोर आली?

सध्या जगभरातद ईदचा उत्साह आहे. ईदमुळे हॉटेल व्यावसायिकाना मोठी कमाई करण्याची संधी असते. परंतु व्यावसायिक गॅस सिलिंडरच उपलब्ध नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. दिल्लीमध्ये तर व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा विकले जात आहेत. दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडर हा 1600 ते 1800 रुपयांना विकला जायचा. आता तोच सिलिंडर तब्बल 4000 रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण झाली आहे. काळाबाजार, कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

बिर्याणी, कोरमा, कबाब यासारखे पदार्थ तर मिळतही नाहीयेत

व्यावसायिक गॅस सिलिंडरच उपलब्ध नसल्याने खानाववळींपासून ते मोठ्या हॉटेल्समध्ये अनेक खाद्यपदार्थ मेन्यूकार्डवरून हटवण्यात आले आहेत. बिर्याणी, कोरमा, कबाब यासारखे पदार्थ तर मिळतही नाहीयेत. गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे आता दुकनादारांची कमाईदेखील कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजारही रोखावा अशी मागणी केली जातेय.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...