Sindhudurg Mango Trader Issue | गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी हापूस आंब्याची अपेक्षित लागण झाली नाही. जिल्ह्यातील आंब्याची झाडे या सीझनमध्ये फळांनी भरलेली असतात, पण यावर्षी झाडांना फळं लागली नाहीत आणि अनेक झाडे वाकलेली दिसत आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी हापूस आंब्याची अपेक्षित लागण झाली नाही. जिल्ह्यातील आंब्याची झाडे या सीझनमध्ये फळांनी भरलेली असतात, पण यावर्षी झाडांना फळं लागली नाहीत आणि अनेक झाडे वाकलेली दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे मोहोर लागल्यानंतर त्यांनी 15-15 दिवसांच्या अंतराने फवारणी केली. फवारणीसाठी दर्जेदार औषधे वापरली गेली, तरीही या वर्षी मोहोर पूर्णपणे जळून गेल्यामुळे झाडांवर फळ उगवलं नाही. यामुळे गुढीपाडव्याला पाठवायचे आंबेही या वर्षी उपलब्ध झाले नाहीत, असं बागायतदारांनी सांगितलं. बागायतदारांनी ही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले असून, आंबा न आल्याने आर्थिक नुकसान झाल्याचेही स्पष्ट केले. सिंधुदुर्गातील बागायतदारांनी या अपुऱ्या हापूस आंब्याच्या लागणीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल

