आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने अनेक चढ-उतार, यश-अपयश आणि पक्षांतर्गत बदल पाहिले आहेत. मात्र, अलिकडच्या काळात पक्षात झालेल्या घडामोडी वेगळ्या स्वरूपाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

बंडखोर खासदारांच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले, “मी याला पक्षफूट म्हणत नाही. एखादा व्यक्ती विचारधारेसाठी, तत्त्वांसाठी किंवा वैचारिक भूमिकेसाठी पक्ष सोडतो, तेव्हा त्याला फूट म्हणता येईल. मात्र स्वतःला राजकीय बाजारात उभं करून दुसऱ्यांनी विकत घेणं, ही वेगळी बाब आहे.”
त्यांनी दावा केला की, काही खासदारांनी स्वतःची राजकीय भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला असून, त्यामागे वैचारिक कारणांपेक्षा इतर घटक अधिक महत्त्वाचे असल्याचे दिसून येते.
दरम्यान, शिवसेनेतील काही खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या घडामोडींवर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
आगामी काळात संबंधित खासदारांची भूमिका आणि पक्षाकडून होणारी पुढील कारवाई याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 19, 2026 11:50 AM
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...