AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा

उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा

| Updated on: Aug 05, 2026 | 10:46 AM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.

बंडखोरी करणाऱ्या सहा खासदारांपैकी दोघांना केंद्र सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा असून, त्यात शिंदे गटाला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्यातील काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना जनतेची कामे प्राधान्याने करण्याचे, आपल्या मतदारसंघात पक्षसंघटना मजबूत करण्याचे आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर मंत्रिमंडळात खांदेपालट अटळ असेल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिल्याचे समजते. काही मंत्र्यांना बैठकीत खरमरीत शब्दांत सुनावण्यात आल्याचीही चर्चा आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षविस्तार अपेक्षित गतीने होत नसल्याबद्दलही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ठाकरे गटातील बंडखोरी आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Published on: Aug 05, 2026 10:28 AM

Follow Us