ना ठाकरे… ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याची चर्चा सुरू असतानाच, पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.

दरम्यान, आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर संबंधित खासदारांनी सोशल मीडियावर वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, या पोस्टमुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही खासदारांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. कोणत्याही विद्यमान नेत्याचा किंवा इतर प्रमुख व्यक्तींचा उल्लेख नसल्याने या पोस्टमागील राजकीय संदेशाबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्वतंत्र गटाच्या नेतृत्वाबाबतही विविध चर्चा सुरू असून, संबंधित खासदारांनी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ते पुढे कोणती राजकीय दिशा स्वीकारणार याबाबत उत्सुकता कायम आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर या पोस्ट विशेष चर्चेत आल्या असून, पुढील काही दिवसांत संबंधित खासदारांकडून भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 19, 2026 10:37 AM
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील