AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, चर्चा काय? सीएमचीही भेट घेणार; काय घडतयं ?

राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद व पक्षाध्यक्षपद सांभाळले आहे. मात्र, अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात डीजीसीए अहवालावर आमदारांनी शंका व्यक्त करत CBI चौकशीची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे. रोहित पवारही याप्रकरणी सातत्याने चौकशीची मागणी करत आहेत.

NCP : राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, चर्चा काय? सीएमचीही भेट घेणार; काय घडतयं ?
सुनेत्रा पवारImage Credit source: Anshuman Poyrekar/ Getty Images
| Edited By: | Updated on: Mar 05, 2026 | 10:16 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बारामतीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चौथ्या दिवशी अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar)) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही सर्वानुमते निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या बैठका, सभा, दौरे यांना आता सुरूवात झाली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक मोठी अपडेट समोर आलीआहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशीरा, मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार या आमदारांनी भेटल्या. या भेटीत आमदारांकडून डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे समजते. अजित पवारा यांच्या अपघातानंतर महिन्याभराने डीजीसीएचा अहवाल समोर आला. मात्र त्या अहवालातील त्रुटी दाखवत तसेच अजित दादांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून देखील अद्याप का नेमण्यात आलेली नाही, याबाबत आमदारांकडून सवाल उपस्थित करण्यात आले.

सुनेत्रा पवारांकडून आश्वासन

या अपघाताबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका असून, सदर शंकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वांनी एकत्रित भेट घेण्याबद्दल आमदारांनी सुनेत्रा पवार यांना विनंती देखील केली. सर्वांनी मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटू असं आश्सावन यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिलं. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचा विमानन अपघातात मृत्यू झाला, त्या अपघातानंतर ज्या वस्तू मिळाल्या, त्याही यावेळी आमदारांना दाखवण्यात आल्या, अशी माहिती समोर आली आहे.

आमदारांमध्ये अस्वस्थता ?

शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातावर सातत्याने भाष्य केलं आहे. अपघात कसा झाला? त्यमागचे सूत्रधार कोण? यावर रोहित पवार बोलत आहेत. प्रझेंटेशन देऊन समजावत आहेत. तसेच अजितदादांचा घातपातच झालाय असंही वारंवार सांगून कारवाईची मागणी करत आहेत. याशिवाय या अपघाताची क्रिमिनल अँगलने चौकशी करण्यासाठी एफआयआर घेण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. मात्र, एफआयआर नोंदवून घेतला जात नाही.

या अपघाताची चौकशी व्हावी म्हणून रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे यांचीही भेट घेऊन चर्चा केली. तसेच राहुल गांधी यांचीही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार आहेत. रोहित पवार या प्रकरणाचं सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असताना अजितदादांच्या पक्षातून मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाही. अमोल मिटकरी वगळता या प्रश्नावर पक्षातील वरिष्ठ नेते भूमिका घेताना दिसत नसून प्रयत्नही करताना दिसत नसल्याने अजितदादांच्या पक्षातील आमदार अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...