AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff : गोळीबाराच्या घटनेनंतर 2 दिवसांत टायगर श्रॉफने घेतला मोठा निर्णय, शूटिंग..

Tiger Health Update : टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर चाहते, हितचिंतक, चिंतेत आहेत. रविवारी संध्याकाळी जुहू येथे अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र या घटनेनंतर 2च दिवसांत तो कामावर परतल्याची बातमी समोर येत आहे.हे खरं आहे का, घेऊया जाणून

Tiger Shroff : गोळीबाराच्या घटनेनंतर 2 दिवसांत टायगर श्रॉफने घेतला मोठा निर्णय, शूटिंग..
| Updated on: Oct 21, 2026 | 5:02 PM
Share

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या चर्चेत आहे. रविवार ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत टायगरला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. टायगरचा एक फोटोही समोर आला होता, ज्यामध्ये त्याच्या हाताला आणि खांद्याला पट्ट्या बांधलेल्या दिसत होत्या. आता या घटनेनंतर टायगर पुन्हा कामावर परतल्याची चर्चा सुरू झाली आहे. टायगर लवकरच ‘लग जा गले’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला तो पुन्हा सुरुवात केल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, ही गोळीबाराची घटना जुहूमधील एका फुटबॉल मैदानातून बाहेर पडत असताना घडली होती. या घटनेत टायगरला किरकोळ दुखापत झाली, मात्र त्याच्या ड्रायव्हरला गोळी लागल्या होती. तो जखमी झाल्यावर टायगरने त्याला गाडीत बसवलं आणि तो स्वत: ड्रायव्हिंग करत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

सेटवर परतला का टायगर श्रॉफ ?

‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफ ‘लग जा गले’ या चित्रपटाच्या सेटवर परतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, टायगर श्रॉफ किंवा त्याच्या टीमकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कधी रिलीज होणार टायगरचा चित्रपट?

टायगर श्रॉफचा आगामी ‘लग जा गले’ हा रोमँटिक ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात टायगरसोबत जाह्नवी कपूर आणि लक्ष्य झळकण्याची शक्यता आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. याआधी राज मेहता यांनी ‘गुड न्यूज’, ‘जुगजुग जियो’ आणि ‘सेल्फी’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट मे 2027 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, ‘लग जा गले’च्या शूटिंगला जानेवारी 2026 मध्ये सुरुवात झाली होती. सुरुवातीला एप्रिलपर्यंत चित्रीकरण पूर्ण करण्याचे नियोजन होतं. मात्र, लक्ष्याच्या लूकमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे शूटिंगचे वेळापत्रक वाढवून ऑक्टोबरपर्यंत करण्यात आल्याचं सांगितले जातं.

हल्लेखोरांना 14 दिवसांची कोठडी

दरम्यान, टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर किल्ला न्यायालयाने आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना एकूण 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सुनावणीदरम्यान किल्ला न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?