Eknath Shinde | विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच दोन दिवसांसाठी दिल्लीचा विशेष दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबत दीड तास सखोल चर्चा झाली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच दोन दिवसांसाठी दिल्लीचा विशेष दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबत दीड तास सखोल चर्चा झाली. दिल्ली दौऱ्याविषयी शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली आणि ती अतिशय सकारात्मक होती. शिंदे यांनी स्पष्ट केले की, अधिवेशन सुरू असताना होणाऱ्या भेटी हे कामाचा एक भाग आहे आणि विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता ते कामावर लक्ष केंद्रित करतात. शिंदे यांनी सांगितले की, “माझ्यासाठी महत्त्वाचे म्हणजे टीका कोण करत आहे हे नाही, तर मी माझं काम कसं करतो हे आहे.” विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देतो असं देखील शिंदे म्हणाले.
Published on: Mar 17, 2026 02:47 PM
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

