AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी? रोहित पवारांच्या त्या दाव्याने एकच खळबळ

Rohit Pawar on Baramati Airport Reiki : अजितदादांचा मृत्यू विमान अपघातात झाला की तो घातपात होता, याविषयावर आमदार रोहित पवार यांनी चौथी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी बारामती विमानतळाची रेकी करण्याविषयी मोठा दावा केला आहे. काय आहे रोहित पवारांचा तो दावा?

Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी? रोहित पवारांच्या त्या दाव्याने एकच खळबळ
बारामती विमानतळाची रेकी?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 12:10 PM
Share

Rohit Pawar on Baramati Airport Reiki : दिवंगत अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. त्यांचा विमान अपघात की घातपात यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार रोहित पवार हे सातत्याने याविषयावर पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे करत आहेत. यापूर्वी त्यांनी तीन पत्रकार परिषद घेतल्या. तर आज चौथ्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजून एक मोठा बॉम्ब टाकला. विमान अपघाताभोवती सशंयाचं धुकं असतानाच आता रोहित पवार यांच्या नवीन दाव्याने खळबळ उडाली आहे. बारामती विमानतळाच्या रेकीविषयी काय आहे रोहित पवार यांचा दावा?

बारामती विमानतळची रेकी?

आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी अजून एका महत्त्वाच्या मुद्दाला हात घातला. “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. कालच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव दिलेलं नाही. कागदपत्रात हेराफेरी होण्याची शक्यता असल्याने नाव दिलं नसेल. २३ तारखेचा एआयबीचा रिपोर्ट आहे. त्यात इन्व्हेस्टिगेटींग करणाऱ्यांचं नाव आहे. पण अजितदादांच्या रिपोर्टमध्ये नाव नाही. अजितदादांबाबतच असा भेदभाव का?” असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

पूर्वी लेयरजेट ४५ द्यायचे. आता लेयरजेट एक्सआर ४५ देत आहेत. म्हणजे पूर्वी ते चुकत होते. आम्ही जे सांगत होतो ते खरं होतं. उद्या असा अपघात होऊ नये हे एआयएबीचं काम आहे. आमचं म्हणणं आहे क्रिमिनल जबाबदारी कुणाची आहे. पण एआयबी म्हणते आम्ही जबाबदारी निश्चित करत नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

ॲरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल करा

तर विमानतळावर दृश्यमानता कमी असताना ते बारामतीकडे कसं वळलं यावर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली. टेक ऑफ करायला कसं दिलं. एआयएबीने त्याकडे दुर्लक्ष केलं. दोन्ही पायलटांना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना २९ आणि ११ नंबर कुठला हे माहीत होतं. या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं आहे. ते बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.

व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, असं त्यागी समितीने म्हटलं आहे. वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यावर त्यागी समिती नेमली होती. त्या समितीने हा रिपोर्ट दिला होता. तरीही लँड करण्यात आलं. ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे ॲरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये ॲरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे, अशी मोठी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...