AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

Modi Government on NEET: दिल्लीतील जंतर मंतरवरील CJP च्या आंदोलनानंतर NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार एक पाऊल मागे आल्याचे दिसते. मोदी सरकार नीट पेपरफुटीप्रकरणी संसदेत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण ही चर्चा कधी होणार याविषयी मोठा संभ्रम आहे.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?
नीट प्रकरणी संसदेत आज चर्चा?
| Updated on: Jul 22, 2026 | 10:23 AM
Share

NEET Discussion in Parliament: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला एक मोठे यश हाती लागताना दिसत आहे. केंद्र सरकार NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार एक पाऊल मागे आल्याचे दिसत आहे. मोदी सरकार नीट पेपरफुटीप्रकरणी संसदेत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कालच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानसमोर आंदोलनाला बसले होते. त्यावेळी त्यांनी भेट घेतली होती. सरकारने त्यांना NEET संदर्भातील सर्व मुद्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. संसदेत नीट पेपरफुटीप्रकरणी चर्चा होण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. पण ही चर्चा कधी होणार याविषयी मोठा संभ्रम आहे.

सरकार पावसाळी अधिवेशनात NEET वर चर्चा करणार?

केंद्र सरकारने NEET पेपरफुटीप्रकरणात चर्चेची तयारी दर्शवली आहे. काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर पक्ष सदस्यांनी नीट पेपरफुटीप्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. लोककल्याण मार्गावर हे आंदोलन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, केंद्रीय गृहसचिव गोविंद मेनन यांनी या नेत्यांची भेट घतेली. संसदेत NEET वर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसने रेटली. त्यावर सरकारच्या प्रतिनिधींनी तात्काळ ही मागणी मान्य केली.

कधी होणार चर्चा?

संसदेत नीटवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका सरकारी शिष्टमंडळाने काल जाहीर केली. पण सरकार आणि विरोधी नेत्यांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात नीट पेपरफुटीप्रकरणी कधी चर्चा होणार हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. सरकारने ही नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात कधी चर्चा होणार हे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. पण जंतर मंतरवरील आंदोलन पाहता लवकरच सरकार चर्चा घडवून आणेल असे चित्र आहे.

राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका

दरम्यान सरकार नीटवर चर्चेस तयार झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काही नवीन मागण्या समोर आणल्या आणि यापूर्वीच्या भूमिकेपासून फारकत घेतल्याचा दावा मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला. इतक्या वरिष्ठ नेत्याने शब्द फिरवणे योग्य नसल्याची टीका जितेंद्र सिंह यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच NEET प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची हमी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान याप्रकरणात लोककल्याण मार्ग परिसरात राहुल गांधी, प्रियंका गांधीस समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल जोरदार आंदोलन केले. त्यांना संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. आज संसदेत या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...