AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाचे थैमान पाहायला मिळाले. आता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहेत.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर
mumbai lake level
| Updated on: Jul 22, 2026 | 10:37 AM
Share

मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे . गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.  मंगळवार, दिनांक 21 जुलै 2026 सकाळी 6 ते बुधवार, दिनांक 22 जुलै 2026 सकाळी 6 या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 61.90% झाला आहे . गेल्या 24 तासात जलाशय साठ्यात 4.15 % वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, तलावांमध्ये सातत्याने पाणी जमा होत असून हा वेग कायम राहिल्यास मुंबईत लागू असलेली पाणीकपात लवकरच मागे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणी पुरवणारे मुख्य दोन तलाव जुलै महिन्यात ओसंडून वाहत आहेत. विहार तलाव आणि तुळशी तलाव ओसांडून वाहत आहे. 18 जुलै 2026 ला सात तलावांमध्ये 7 लाख 34 हजार 891 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता तर तो 20 जुलै 2026 रोजी 7 लाख 82 हजार 370 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. आता 22 जुलै, 2026 पर्यंत, एकूण पाणीसाठ 8 लाख 35 हजार 919 दशलक्ष लिटर झाला आहे, जो एकूण साठवण क्षमतेच्या 57.75% आहे. तुळसी आणि विहार हे दोन तलाव आधीच 100% क्षमतेने भरले आहेत. आता लवकरच इतर तलाव साठे ही भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुलै महिन्यात पावसाचा थैमान पाहायला मिळाला. आता जुलै महिना संपत आला आहे तरीही पावसाचा जोर कायम असल्याने हे तलावसाठे दुथडी भरुन वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय, पाणी शुद्धीकरण केंद्र असलेल्या भांडुप संकुल परिसरात गेल्या 24 तासांत 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या हंगामातील एकूण पर्जन्यमान आता 2006 मिमीवर पोहोचले आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवसांतही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असल्याने इतर प्रमुख धरणांमधील साठ्यातही वेगाने वाढ होण्याची अपेक्षा नाकारता येत नाही.

कोणत्या तलावात सध्या किती पाणीसाठा? 

  • अप्पर वैतरणा – 72,209 (36.41%)
  • मोडक सागर – 1,02,000 (83.18%)
  • तानसा- 1,22,404 (93.22%)
  • मध्य वैतरणा- 90,528 (50.21%)
  • भातासा – 3,35,495 (57.17%)
  • विहार- 27,698 (100%)
  • तुळशी – 8,046 (100%)

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी