AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा
IMD weather updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 8:53 PM
Share

राज्यात एक जुलै ते आठ जुलैदरम्यान जोरदार पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळत आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. येत्या 24 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असून, मराठवाड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज? 

विदर्भात पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.  काही जिल्ह्यात साधारण तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  गोंदिया भंडारा , गडचिरोली जिल्ह्याला पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 24 जुलैनंतर पावसात पुन्हा खंड पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.  महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात कमी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये पावसाला सुरुवात  

चिपळूण तालुक्यातील नायशी गावात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे.  दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पावसाची दमदार सुरुवात झाली असून, सखल भागात त्यामुळे पाणी साचलं आहे. दरम्यान या पावसामुळे आता तालुक्यातील शेतीच्या कामाला वेग येणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर आणखी वाढू शकतो असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

मुंबईमध्येही पाऊस 

दरम्यान पुन्हा एकदा मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसासोबतच वारं देखील असल्यामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जोरदार पाऊस सुरू आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच