AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

बदलापूरमध्ये साडीच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे भयावह पर्यवसान झाले आहे. पत्नीने अपंग पती हरेराम सिंग यांची हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र एका गोष्टीमुळे हे हत्याकांड उघडकीस आलं.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !
| Updated on: Jul 22, 2026 | 10:59 AM
Share

संसार, लग्न म्हटलं की भांड्याला भाडं लागतंच. पती-पत्नीमध्ये वादं होतच असतात, पण कधीकधी तो वाद इतका टोकाला जातो की क्षणात होत्याचं नव्हतं असं होतं, सगळं काही उद्ध्वस्त होतं. बदलापूरमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. तेथे एका साध्या साडीपायी अख्खा संसार क्षणात मोडला. बदलापूर पूर्व परिसरातील शिरगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पतीने साडी घेऊन दिली नाही, या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून, हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हरेराम सिंग आणि त्यांची पत्नी सुनीता देवी हे शिरगाव येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला. सुनिता यांनी साडीची मागणी केली मात्र. पतीने ती पूर्ण केली नसल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद विकोपाला गेला.  संतापाच्या भरात सुनीता देवी यांनी स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर हरेराम सिंग यांच्या डोक्यात मारला. त्यानंतर त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. हरेराम सिंग हे शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने ते अंथरुणावरच होते. त्यामुळे त्यांना प्रतिकार करणे शक्य झाले नसल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

एका चुकीने फुटलं बिंग

या संपूर्ण घटनेवेळी दाम्पत्याचा सात वर्षांचा मुलगा घरातच उपस्थित होता. सुरुवातीला सुनीता देवी यांनी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत घटनेबाबत चुकीची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर घटनेचा तपशील समोर आला. मुलाच्या साक्षीनंतर पोलिसांनी संशय अधिक बळावल्याने आरोपी महिलेची कसून चौकशी केली आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. मुलाच्या साक्षीने सुनिताचं बिंग फुटलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरेराम सिंग आणि सुनीता देवी यांच्यात यापूर्वीही वारंवार कौटुंबिक वाद होत असत. त्यामुळे ही घटना केवळ साडीच्या मागणीवरून घडली की त्यामागे दीर्घकाळ सुरू असलेले कौटुंबिक मतभेद, आर्थिक तणाव किंवा इतर काही कारणे होती, याचा सखोल तपास सुरू आहे. तसेच, हत्येच्या वेळी घटनास्थळी आणखी कोणी उपस्थित होतं का, या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच आरोपी महिलेने पुरावे नष्ट करण्याचा किंवा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला का, या सर्व बाबींचा तपास बदलापूर पूर्व पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कौटुंबिक वाद इतक्या टोकाला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Follow Us
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खबळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश
पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधाना
पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधानानेच उडवली खळबळ
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले अन्... रडारवर कोणता मंत्री?
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय पकडले अन्...
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय धरले अन्... नागपूरात मोठ्या घडामोडी
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30...
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?