भारताचे पाय पकडण्याची वेळ अमेरिकेवर, यामुळे बदलली भूमिका, थेट गुजरातच्या..
इराणसोबतच युद्धात अमेरिकेची पार वाट लागली. मोठे नुकसान झाले. यादरम्यानच काही देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका होती. त्यात भारताचेही नाव होते. पण आता अमेरिकेने मोठी पलटी मारल्याचे बघायला मिळतंय.

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात बघायला मिळत आहेत. मात्र, अचानक पुन्हा एकदा अमेरिकेचे भारत प्रेम उतू जाताना दिसत आहे. भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्यासाठी निघालेल्या अमेरिकेने पलटी मारली. त्यातच अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो दुसऱ्यांदा भारताच्या दाैऱ्यावर आलेत. त्यांचा भारत दाैरा हा तेल रिफायनरीसाठी आहे. भारताची तेल रिफायनरी जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी आहे. जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी आज भारताच्या गुजरातमधील जामनगर येथे आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो यांनी अमेरिका वेनेजुएलाच्या कच्च्या तेलाच्या रिफायनरी तेलाची क्षमता वाढवण्यासाठी रिलायंससोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, भारत तेलाची मोठी ताकद असल्याचे सांगत त्यांनी वॉशिंग्टनच्या भारत ऊर्जा तेल आयात स्त्रोताच्या विविधतेला समजते.
मुंबईमध्ये मीडियासोबत बोलताना मार्काे रूबियो यांनी म्हटले की, रिलायंसने यापूर्वीही वेनेजुएलासोबत काम केले. कंपनीकडे मोठ्या प्रमाणात तेल रिफायनरी करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची चर्चा सुरू असेल. रिलायंसजवळ वेनेजुएला संबंधित अधिकार आहेत, त्यापूर्वीही त्यांनी यावर काम केले. मार्काे रूबियो यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यात म्हटले की, भारत वारंवार आपल्या ऊर्जा आयातीचे स्त्रोत बदलत आलेला आहे.
ती त्यांची व्यावसायिक रणनीती आहे. तेल खरेदीचा बदल एकाच रात्रीत नक्कीच होऊ शकत नाही. पण भारताने या प्रकरणात मोठी प्रगती ही नक्कीच केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्काे रूबियो गुजरातच्या जामनगर रिलायंसच्या रिफायनरी दाैरा करणार आहेत. रात्रीही ते तिथेच राहणार आहेत. मार्काे रूबियो मुकेश अंबानी यांच्यासोबत वंतारामध्ये रात्री जेवण करतील.
रिलायंसमुळेच अमेरिकेची भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बोलले जात आहे. अमेरिकाला भारताची मोठी मदत लागणार आहे. त्याकरिता भारताबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळत आहे. नाही तर भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका होती. भारत आणि अमेरिकेचे संबंध टॅरिफमुळे तणावात आहेत. अमेरिकेला आता फायदा दिसत असल्याने त्यांनी भूमिका बदलली.
