AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FEATURED

JIP IPO: एका तासातच तुफान प्रतिसाद, जिओच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 13,428 रुपयांच्या गुंतवणूकीत व्हा मालामाल

Jio IPO listing price: जिओ प्लॅटफॉर्मच्या बहुप्रतिक्षित आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. अवघ्या एका तासातच या आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या एका तासाच 83 टक्के सब्सक्रिप्शन मिळाले. QIB हिस्सा2.86 पट सबस्क्राईब झाला तर किरकोळ गुंतवणूकदारांकडून 13% बोली लागली.

JIP IPO: एका तासातच तुफान प्रतिसाद, जिओच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 13,428 रुपयांच्या गुंतवणूकीत व्हा मालामाल
जिओच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 13,428 रुपयांच्या गुंतवणूकीत व्हा मालामाल
| Updated on: Oct 21, 2026 | 11:55 AM
Share

Reliance Jio IPO share price Today: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या बहुप्रतिक्षित आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. 21 ऑक्टोबर रोजी सब्सक्रिप्शन उघडल्यावर सुरूवातीच्या एका तासातच 83 टक्के सब्सक्रिप्शन मिळाले. QIB हिस्सा2.86 पट सबस्क्राईब झाला तर किरकोळ गुंतवणूकदारांकडून 13% बोली लागली. सकाळी 10 वाजता हा तुफान प्रतिसाद दिसून आला. अर्थात किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद संथ असल्याचे समोर आले आहे.

QIB श्रेणीत तुफान प्रतिसाद 

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या या आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 1,065 ते 1,119 रुपये इतका प्राईस ब्रँड ठेवला आहे. बाजारातील विश्लेषक आणि ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक करणे सोपे आहे. एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना जवळपास 13,428 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या 30,213 कोटींच्या आयपीओच्या QIB श्रेणीला सुरुवातीच्या तासाभरातच मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजेपर्यंत या श्रेणीसाठी राखीव असलेल्या शेअर्सच्या तुलनेत 2.86 पट अधिक बोली लागली. इश्यू उघडल्यानंतर अवघ्या 30 मिनिटातच QIB चा वाटा पूर्णपणे सबस्क्राईब झाला होता. संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे.

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

जिओ प्लॅटफॉर्म्सकडे भारताचा सर्वात मोठा 5G ग्राहक वर्ग आहे. JioFiber आणि JioAirFiber चे जाळे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारीत सेवा, कंपनीचे प्रति युझर्स सरासरी मासिक उत्पन्न सतत वाढत आहे. डिजिटल तंत्रज्ञानात जिओ आघाडीवर आहे. कंपनीचा वाढता परीघ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे या आयपीओला संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर अगोदर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा करा आणि मगच निर्णय घ्या.

किरकोळ गुंतवणूकदारांची संथ चाल

QIB श्रेणीच्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांकडून संथ प्रतिसाद मिळालेला आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या भागात 13 टक्के सबस्क्रिप्शन नोंदवले गेले. तर बिगर संस्थागत गुंतवणूकदारांनी 14 टक्के बोली लावल्या. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या भागात 35 टक्के आणि विद्यमान भागधारकांसाठी राखीव गटात 26 टक्के सबस्क्रिप्शन झाले. ही सर्व आकडेवारी सकाळी 10 वाजेपर्यंतची आहे.

IPO इतका मोठा

कंपनी बाजारातून या आयपीओच्या माध्यमातून 30,213 कोटींचे भांडवल उभारण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी सर्वात मोठा आयपीओ हा Hyundai Motor India चा होता. कंपनीने 2024 मध्ये जवळपास 27,870 कोटी रुपये जमा केले होते. त्यापूर्वी 2022 मध्ये LIC ने जवळपास 21,000 कोटी रुपये बाजारातून उभे केले होते. या दोन्हींपेक्षा जिओचा आयपीओ मोठा आहे. डॉलरच्या मूल्यात तुलना करता Hyundai 3.3 अब्ज डॉलरसह या भांडवल उभारणीत अग्रेसर आहे. व्हेंटुरा सिक्युरिटीजने आयपीओला सब्सक्राईब रेटिंग दिले आहे. जिओने स्वतःचा स्वतंत्र 5G स्टॅक विकसीत केला आहे. 4G, 5G, 6G आणि AI तंत्रज्ञानाशी संबंधित 7,220 पेटेंटसाठी कंपनीने अर्ज दाखल केले आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. तर कंपनीचे स्वतःचे AI प्लेटफॉर्म JioBrain नेटवर्क मोठी भूमिका बजावत आहे.

डिस्क्लेमर: ही केवळ माहिती आहे. कोणत्याही शेअर अथवा आयपीओमध्ये गुंतवणुकीचा टीव्ही 9 मराठी सल्ला देत नाही. गुंतवणूकीपूर्वी अर्थ सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी