AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio IPO: कमाईची मोठी संधी! आज उघडणार भारतातील सर्वात मोठा IPO, जाणून घ्या ए टू झेड माहिती

Jio IPO Open Today : भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO, जिओ आयपीओ आज 21 ऑक्टोबर रोजी उघडत आहे. त्यापूर्वी जाणून घ्या याविषयीची ए टू झेड माहिती...

Jio IPO: कमाईची मोठी संधी! आज उघडणार भारतातील सर्वात मोठा IPO, जाणून घ्या ए टू झेड माहिती
Jio IPO: कमाईची मोठी संधी!
| Updated on: Oct 21, 2026 | 8:01 AM
Share

Jio IPO Open Today : आज 21 ऑक्टोबरपासून Jio Platforms चा IPO उघडणार आहे. जवळपास 30,213 कोटी रुपयांचा हा इश्यू भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आहे. मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह जवळपास 20 वर्षांनी सर्वात मोठा आयपीओ घेऊन आला आहे. या आयपीओकडे बाजाराचे आणि गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचा प्रिमियम 22 टक्क्यांच्या घरात आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 30,213 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे.

Jio IPO केव्हा उघडणार आणि बंद होणार

IPO 21 ऑक्टोबर रोजी, आज गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर शेअर्सचे अलॉटमेंट 26 ऑक्टोबर रोजी होईल. 28 ऑक्टोबर रोजी शेयर NSE आणि BSE वर सूचीबद्ध होतील.

एक शेअर कितीचा आणि कमीत कमी किती करावी लागेल गुंतवणूक?

कंपनीचा प्राईस ब्रँड 1,065 रुपये ते 1,119 रुपये प्रति शेअर असेल. एका लॉटमध्ये 12 शेअर असतील तर त्या आधारे कमीत कमी 13,428 रुपये गुंतवावे लागतील. सामान्य गुंतवणूकदार कमाल 14 लॉटसाठी बोली लावू शकतो. गुंतवणूक करू शकतो.

IPO किती मोठा?

कंपनी बाजारातून या आयपीओच्या माध्यमातून 30,213 कोटींचे भांडवल उभारण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी सर्वात मोठा आयपीओ हा Hyundai Motor India चा होता. कंपनीने 2024 मध्ये जवळपास 27,870 कोटी रुपये जमा केले होते. त्यापूर्वी 2022 मध्ये LIC ने जवळपास 21,000 कोटी रुपये बाजारातून उभे केले होते. या दोन्हींपेक्षा जिओचा आयपीओ मोठा आहे. डॉलरच्या मूल्यात तुलना करता Hyundai 3.3 अब्ज डॉलरसह या भांडवल उभारणीत अग्रेसर आहे.

20 वर्षानंतर Reliance चा IPO का खास?

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने यापूर्वी 2006 मध्ये Reliance Petroleum चा आयपीओ आणला होता. 1977 मध्ये धीरुभाई अंबानी यांनी Reliance Textile Industries बाजारात उतरवली होती. Jio बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर Reliance समूह त्यांच्या सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्यांच्या आधारे देशातील सर्वात मोठा समूह ठरणार आहे. गुंतवणूकदार या आयपीओला किती प्रतिसाद देतात हे आज समोर येईल.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!