Bharat Gogawale | आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी, पण गोगावलेंनी सांगितलं विधानामागचं कारण
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून त्यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून त्यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना गोगावले म्हणाले की, आव्हाड यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून त्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. त्यांनी नंतर अध्यक्षांसमोर माफी मागितली असली, तरीही काही लोक प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची विधाने करतात, असा टोला त्यांनी लगावला. “आव्हाड काही दिवसांपासून चर्चेत नव्हते, त्यामुळे त्यांनी प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात ते अपयशी ठरले,” अशी टीका गोगावले यांनी केली.
Published on: Mar 17, 2026 04:42 PM
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले

