AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी

Pawanraje Nimbalakr Case | पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी

| Updated on: Jun 20, 2026 | 11:53 AM
Share

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. निकाल वाचताना न्यायाधीशांनी अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. निकाल वाचताना न्यायाधीशांनी अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली. 2002 नंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात कट्टर राजकीय वैमनस्य निर्माण झाल्याचे पुराव्यांमधून समोर आल्याचे न्यायालयाने नमूद केले. दोघांमध्ये विधानसभा निवडणुकांमधून राजकीय संघर्ष वाढला होता, असेही कोर्टाने म्हटले.

या खटल्यातील माफीचा साक्षीदार पारसमाल जैन हा संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र त्याने दिलेला कबुलीजबाब संशयास्पद असल्याची गंभीर टिप्पणीही कोर्टाने केली. 2009 मध्ये क्राईम ब्रांचने त्याला ताब्यात घेतले आणि अनेक महिने बेकायदेशीरपणे ठेवले, असा दावा पारसमाल जैनने केला होता.

तसेच पोलिसांनी त्याला मारहाण आणि मानसिक त्रास दिल्यानंतर कबुली दिल्याचे त्याचे म्हणणे असल्याचे न्यायालयाने सांगितले. पीआय प्रवीण भगत यांनी अटक केल्याचा उल्लेखही कोर्टात झाला. क्राईम ब्रांचच्या ताब्यातील 3 महिन्यांचा स्पष्ट खुलासा सरकारकडून करण्यात आला नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. एकूणच काही वेळात अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 20, 2026 11:53 AM

Follow Us