AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagar Parishad Elections 2025 : मतदानादिवशी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Nagar Parishad Elections 2025 : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या मित्र पक्षांमध्येच हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हे घडलं आहे. शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडले आहेत.

Nagar Parishad Elections 2025 : मतदानादिवशी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
Shivsena-BJP
| Updated on: Dec 02, 2025 | 10:19 AM
Share

राज्यात आज 250 पेक्षा जास्त नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. काही ठिकाणी सुरळीत मतदान सुरु आहे, तर काही ठिकाणी समस्या आहेत. बदलापूरमध्ये मतदानाच्या दिवशी भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते आपसात भिडले आहेत. बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड जवळ भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. बस स्टँड परिसरात मतदारांना स्लिप वाटणे, त्याचबरोबर बुथ लावण्यावरून राडा झाला. राडा प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती.

बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सकाळीच सुरू झालीय. नगराध्यक्षपदासह 43 जागांसाठी हे मतदान होतंय. मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय.सकाळीच मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळतय. बदलापुरातल्या गांधी चौकातील मराठी शाळेत मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मतदान शांततेत पार पाडाव यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरे गटाकडून प्रिया गवळी, अपक्ष संगीता चेंदवणकर आणि कडून आस्था मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या निवडणुका रखडल्या होत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका खूप महत्वाच्या असतात.या निवडणुका रखडल्या होत्या. पण आता कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका पार पडतायत. पक्ष विस्तार आणि नवीन नेतृत्व घडवणं या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या असतात.

बोगस मतदान करताना पकडलं

बुलढाण्यात बोगस मतदान करताना एका युवकाला पकडलं. मतदान प्रतिनिधींनी या युवकाला चोप दिला.मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. बोगस मतदान करणाऱ्या युवकाला इतरांनी पळवून लावलं. यामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झालाय.

EVM मशीन बंद पडली

अक्कलकोटमधील नगर परिषदेत उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरील EVM  मशीन बंद पडली. मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोली मधील मशीन तब्बल अर्ध्या तासापासून बंद आहे. सकाळच्या सत्रात मतदान करायला आलेल्या मतदारांची उडाली तारांबळ. निवडणूक कर्मचाऱ्यांनाकडून मशीन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....