AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्रायल युद्धाची सर्वात मोठी झळ भारताला बसणार? हिंदुस्थानकडे किती दिवसाचे तेल शिल्लक? एकूण 700 टँकर…

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका फक्त इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांनाच बसत नाहीये तर थेट जगाला बसत आहे. कच्च्या तेलाच्या आयातीलवर भयंकर परिणाम होताना दिसत आहे. त्यामध्येच खळबळजनक आकडे पुढे येताना दिसत आहेत.

इराण-इस्रायल युद्धाची सर्वात मोठी झळ भारताला बसणार? हिंदुस्थानकडे किती दिवसाचे तेल शिल्लक? एकूण 700 टँकर...
oil tanker
| Updated on: Mar 03, 2026 | 2:28 PM
Share

अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. मात्र, या युद्धाचा फटका थेट संपूर्ण जगाला बसताना दिसतोय. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. इराणच्या तेल जहाजांवर मोठा हल्ला अमेरिकेकडून केला जात आहे. अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहे. इराणकडून अमेरिकेचे लष्कर तळ ज्या ज्या देशांमध्ये आहेत, तिथे हल्ले केली जात आहेत. कतार, साैदी अरेबिया, इराक, कुवेत अशा देशांवर हल्ले केले जात आहेत. शिवाय तेल प्रकल्पांनाही टार्गेट केले जात आहे. या युद्धाचा परिणाम भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यामध्येच आता जगाची झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट ऑफ होर्मुजवर तेल टॅंकर 80 टक्के कमी झाल्याचे स्पष्ट होतंय. यासोबतच जल मार्गावर हजारो टँकरचा मोठा जाम लागला आहे.

हा परिस्थिती अशावेळी आहे, ज्यावेळी इराण रिवॉल्युशनरी गार्ड्सने स्टेट बंद करण्याची मोठी आणि धक्कादायक घोषणा केली. हेच नाही तर येथून जाणाऱ्या टँकरला थेट आग लावून देण्याचीही धमकी त्यांनी दिली. 1 मार्च रोजी फक्त 3 तेल टँकर होर्मुजहून गेले. ज्यामध्ये 28 लाख बॅरल होते. 2 मार्चला फक्त एक छोटे टँकर गेले. 1.5 करोड बॅरल म्हणजेच 20 टक्के कच्चे तेल होर्मुज जलडमरूमधून जाते.

हा तेल मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, आता जाणारी वाहतूक जवळपास बंद आहे आणि हे अत्यंत मोठे संकट आहे. इराण आणि अन्य देशातून जाणाऱ्या कच्च्या तेलाची संख्या खूपच जास्त कमी आहे. यामुळे कच्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. इराणचे कमांडर इन चीफ यांचे सल्लागार इब्राहिम जबारी यांनी ऑफ होर्मुज बंद केल्याची मोठी घोषणा केली.

हेच नाही तर या मार्गाने कोणी जाण्याची हिंमत केली तर आम्ही तेल टँकरला आग लावू अशी धमकीही त्यांनी दिली. यासर्व पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांसोबत भारत सरकारने महत्वाची बैठक घेतली आणि या काळात भारताकडे नक्की किती तेल शिल्लक आहे, याची तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला भारताकडे 74 दिवस पुरेल इतके तेल शिल्लक आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...