AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा टॉवेल कधी धुवावा? किती दिवसांनी बदलावा? नियम एकदा वाचा

तुमचा टॉवेल किती दिवसांनी धुवावा आणि तो किती वर्षांनी बदलावा? टॉवेलमधील बॅक्टेरिया आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेला हा महत्त्वाचा सल्ला नक्की वाचा.

| Updated on: Mar 03, 2026 | 2:45 PM
Share
आपल्यापैकी अनेकजण चादरी, उशांचे कव्हर किंवा टॉवेल धुण्याबाबत थोडे निष्काळजी असतो. अजून तर स्वच्छ दिसतोय, एक-दोन दिवस अजून चालेल असा विचार आपण अनेकदा करतो. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते.

1 / 8
'टॉवेल सुपरसेंटर'च्या अहवालानुसार, अनेकांना वाटते की आंघोळीनंतर शरीर स्वच्छ असल्याने टॉवेल घाण होत नाही. मात्र हे वास्तव वेगळे आहे. जेव्हा तुम्ही ओल्या टॉवेलने शरीर पुसता तेव्हा त्यात मृत पेशी लवकर साचतात.

2 / 8
त्यासोबतच शरीरावरील नैसर्गिक तेल टॉवेलमध्ये शोषले जातात. टॉवेल पूर्णपणे कोरडा व्हायला वेळ लागतो. हे दमट वातावरण बॅक्टेरिया, बुरशी (Fungus) आणि यीस्ट वाढण्यासाठी पोषक ठरते. यामुळे त्वचेचे संक्रमण, मुरुम आणि अॅथलीट फूट सारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 8
यासाठी बाथरूममध्ये दमटपणा जास्त असेल, तर टॉवेल तिथे वाळत घालू नका. तो नेहमी मोकळ्या आणि सूर्यप्रकाश असलेल्या जागी वाळवावा. मायक्रोफायबर टॉवेल लवकर सुकतात, तर सुती (Cotton) टॉवेल ओलावा जास्त काळ टिकवून ठेवतात. बांबू टॉवेल अँटीबॅक्टेरियल असले तरी ते नियमित धुणे अनिवार्य आहे.

4 / 8
प्रसिद्ध तज्ज्ञ जेनिफर ॲडम्स यांच्या मते, वारंवार धुण्यामुळे टॉवेलमधील कापसाचे तंतू कमकुवत होतात आणि त्याची पाणी शोषण्याची क्षमता (Absorbency) कमी होते.

5 / 8
त्यामुळे साधारणपणे दर २ ते ३ वर्षांनी जुना बाथ टॉवेल बदलून नवीन खरेदी करावा. तसेच तुम्ही वापरत असलेला कोणताही टॉवेल जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंतच वापरावा. यामुळे तुमची त्वचा सुरक्षित राहते.

6 / 8
प्रत्येक वापरानंतर टॉवेल धुण्याची गरज नसली तरी साधारणपणे ३ ते ४ वापरानंतर बाथ टॉवेल धुतला पाहिजे. तसेच हात पुसण्यासाठी वापरला जाणारा टॉवेल जास्त वेळा धुवावा. कारण त्याचा वापर वारंवार होतो.

7 / 8
जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, तर त्यांचा टॉवेल नियमित धुवावा. त्यासोबतच जिममध्ये वापरलेला टॉवेल नियमित धुतलेला उत्तम असतो. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर प्रत्येक वापरानंतर टॉवेल धुवावा.

8 / 8
Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.