काय हे? अंशुल कंबोजला धु धु धुतला, गोलंदाजाने लुटवल्या 500 पेक्षा अधिक धावा

21 मे 2026

Created By:  संजय पाटील

अंशुल कंबोज आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

अंशुल कंबोज चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्यासह या मोसमात सर्वात जास्त धावा लुटवणारा गोलंदाजही आहे.

अंशुलने आयपीएल 2026 स्पर्धेत 14 सामन्यांत 21 विकेट्स मिळवल्या. अंशुलने या दरम्यान 10.45 च्या इकॉनमीने धावा लुटवल्या.

अंशुलने IPL 2026 स्पर्धेत एकूण 516 रन्स लुटवल्या. अंशुल यासह या मोसमात 500 पेक्षा अधिक धावा देणारा पहिला गोलंदाज ठरला. 

अंशुलने चेन्नई विरुद्धच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 56 रन्स दिल्या.

अंशुलने लखनौ विरूद्धच्या  सामन्यात तर कहर केला होता. अंशुलने लखनौ विरुद्ध 2.4 ओव्हरमध्ये 63 रन्स दिल्या होत्या.

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, अंशुल  सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.