'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील पत्रकार पोपटलाल यांची कमाई किती ?
Created By: Atul Kamble
22 May 2026
टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांना अभिनयात करीयर करण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पोपटलाल यांचा रोल करणारे श्याम पाठक यांचे जीवन संघर्षमय होते.
कॉलेजच्या दिवसात त्यांनी कुटुंबाच्या मदतीसाठी अनेक छोटी-मोठी कामे केली. सेल्समनची देखील नोकरी केली.
श्याम पाठक यांची कम्युनिकेशन स्कील्स चांगली असल्याने त्यांनी सेल्ममनचे काम चांगले केले.
आज श्याम पाठक 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मुळे घराघरात प्रसिद्ध आहेत.
या शोच्या एका एपिसोडसाठी श्याम पाठक यांना ६० हजार रुपये वेतन मिळते, दर महिन्याला या मालिकेचे २६ एपिसोड टेलिकास्ट होतात. म्हणजे या प्रकारे त्यांची महिन्याची कमाई १५ लाख रुपये होते.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'ही मालिका साल २००८ रोजी सुरु झाली. तेव्हापासून श्याम पाठक पोपटलाल बनून लोकांना हसवत आहेत.