मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, ‘आंदोलन मागे घ्या’ या विनंतीवर जरांगेंचं थेट उत्तर, काय म्हणाले? पाहा…
मराठा आंदोलक तथा मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात अंतरावली सराटी येथे महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे यांनी 30 तारखेला उपोषण सुरू करण्याचं सांगितल्यानंतर या भेटीला महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी मराठा समाजाच्या विविध मागण्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि आंदोलकांवरील कारवाई या विषयांवर दोघांमध्ये सविस्तर संवाद सुरू आहे.
मराठा आंदोलक तथा मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात अंतरावली सराटी येथे महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे यांनी 30 तारखेला उपोषण सुरू करण्याचं सांगितल्यानंतर या भेटीला महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी मराठा समाजाच्या विविध मागण्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि आंदोलकांवरील कारवाई या विषयांवर दोघांमध्ये सविस्तर संवाद सुरू आहे. सर्वप्रथम प्रसाद लाड यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याची चर्चा असून त्यावर मनोज जरांगे यांनी सरकारने आधी प्रश्न सोडवावेत, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचे समजते.
चर्चेदरम्यान जरांगे यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. राज्यातील सुमारे 80 हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडल्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचाही मुद्दा जरांगे यांनी उपस्थित केला. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम

