AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RCB : इशान, क्लासेन अभिषेकचा तडाखा, आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, हैदराबादच्या 255 धावा, कोण जिंकणार?

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru 1st Innings Highlights, IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या 5 फलंदाजांनी तुफानी बॅटिंग करुन आरसीबीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. हैदराबादने अशाप्रकारे 255 रन्सचा डोंगर उभा केला.

SRH vs RCB : इशान, क्लासेन अभिषेकचा तडाखा, आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, हैदराबादच्या 255 धावा, कोण जिंकणार?
Abhishek Sharma SRH vs RCBImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 22, 2026 | 10:38 PM
Share

सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांची बेदम धुलाई करुन 250 पार मजल मारली आहे. हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात आरसीबीसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. हैदराबादची अशाप्रकारे 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही नववी वेळ ठरली. तसेच हैदराबादने या डावात 16 षटकार लगावले. हैदराबादला या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात 5 फलंदाजांनी योगदान दिलं. मात्र तिघांनी प्रमुख भूमिका बजावली. हैदराबादसाठी कोणत्या फलंदाजाने किती धावा केल्या? हे सविस्तर जाणून घेऊयात.

हैदराबादची बॅटिंग

हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड याने दोघांनी 24 बॉलमध्ये 45 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. त्यांनतर हेड 26 रन्स करुन आऊट झाला. अभिषेक आणि इशानने दुसऱ्या विकेटसाठी 26 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 22 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 फोरसह 56 रन्स करुन माघारी परतला.

इशान-क्लासेनचा तडाखा

इशान किशन आणि हेनरिक क्लासेन या सलामी जोडीने हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 48 बॉलमध्ये 113 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर क्लासेन आऊट झाला. क्लासेनने 24 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 फोरसह 51 रन्स केल्या. तर हैदराबादने इशान किशन याच्या रुपात चौथी आणि अखेरची विकेट गमावली. इशानने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. इशानने 46 चेंडूत 3 सिक्स आणि 8 चौकारांसह 79 धावांचं योगदान दिलं. तर नितीश कुमार रेड्डी याने 3 षटकार आणि 1 चौकारसह 12 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या.

आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई

आरसीबीसाठी एकूण 6 गोलंदाजांनी बॉलिंग केली. हैदराबादच्या फलंदाजांनी आरसीबीच्या प्रत्येक बॉलर विरुद्ध किमान 12 च्या इकॉनमी रेटने धावा केल्या. आरसीबीसाठी रसीख सलाम डार याने 2 विकेट्स मिळवल्या. तर सुयश शर्मा आणि कृणाल पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

आरसीबी ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. मात्र आरसीबीला प्लेऑफच्या हिशोबाने टॉप 2 मध्ये कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हैदराबाद विरुद्ध 166 धावा कराव्या लागणार आहेत. तर हैदराबादला टॉप 2 मध्ये पोहचायचं असेल तर आरसीबीला 165 रन्सपर्यंत रोखावं लागणार आहे.

लाईव्ह स्कोअरकार्ड

हैदराबादमधील आकडेवारी काय सांगते?

राजीव गांधी स्टेडियममध्ये आयपीएल 2026 स्पर्धेतील आयोजित करण्यात आलेला हा सातवा सामना आहे. याआधी या मैदानात झालेल्या 6 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर चेजिंग करणाऱ्या संघाने 2 वेळा विजय मिळवला आहे. अशात आता हैदराबाद जिंकणार आरसीबी मैदान मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...