निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? मोठी अपडेट समोर…
राज्यसभेच्या एकूण 24 जागांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. या 24 जागांवर 18 जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांतील खासदार निवृत्त झाले आहेत. तर काहींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या निवडणुका होत आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
राज्यसभेच्या एकूण 24 जागांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. या 24 जागांवर 18 जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांतील खासदार निवृत्त झाले आहेत. तर काहींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या निवडणुका होत आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून त्याजागी राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागलं आहे. या जागेसाठी मोठी लॉबिंग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कुणाला राज्यसभेत पाठवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुनेत्रा पवारांसह तामिळनाडूतील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. येत्या 8 जूनपर्यंत राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर 18 जूनला रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या जागी राष्ट्रवादीतून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 22, 2026 12:25 PM
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
शरद पवार गट NDAमध्ये जाणार?; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर!

