AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RCB Score Updates and Highlights, IPL 2026: हैदराबादचा 55 धावांनी विजय, आरसीबीचा पराभवाने शेवट

| Updated on: May 23, 2026 | 3:41 AM
Share

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Indian Premier League 2026 Score Updates and Highlights In Marathi: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांचा 19 व्या मोसमातील हा 14 वा आणि शेवटचा सामना होता. हैदराबादने या सामन्यात गतविजेत्या आरसीबीला पराभूत केलं.

SRH vs RCB Score Updates and Highlights, IPL 2026: हैदराबादचा 55 धावांनी विजय, आरसीबीचा पराभवाने शेवट
RCB vs SRH Live IPL 2026Image Credit source: TV9

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2026 स्पर्धेत दुसऱ्यांदा पराभूत करण्यात अपयशी ठरली. सनरायझर्स हैदराबादने राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 55 धावांनी विजय मिळवला. टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी केलेल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावांचा डोंगर उभारला.  मात्र आरसीबीला या धावांचा पाठलाग करताना 4 विकेट्स गमावून 200 रन्सपर्यंतच पोहचता आलं. सनरायझर्स हैदराबादने यासह सामना जिंकला. हैदराबादने यासह साखळी फेरीचा शेवट विजयाने केला. तर आरसीबी अपयशी ठरली. या विजयानंतर क्वालिफायर 1 चं चित्र स्पष्ट झालं आहे. क्वालिफायर 1 मध्ये आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना होणार आहे. तर हैदराबादला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. हैदराबादसमोर एलिमिनेटर सामन्यात चौथ्या स्थानी असणाऱ्या संघाचं आव्हान असणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 22 May 2026 11:33 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादचा 55 धावांनी विजय, आरसीबीचा पराभवाने शेवट

    सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकला आहे. हैदराबादने घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 55 धावांनी विजय मिळवला.  हैदराबादने आरसीबीसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून  200 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबी अशाप्रकारे साखळी फेरीचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली.

  • 22 May 2026 11:24 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : रजत पाटीदार आऊट, आरसीबीला चौथा धक्का

    सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला चौथा झटका दिला आहे. ट्रॅव्हीस हेड याने आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याला आऊट केलं. रजतने 39 बॉलमध्ये 56 रन्स केल्या.

  • 22 May 2026 11:22 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : सनरायझर्स हैदराबादचं टॉप 2 गणित चुकलं

    सनरायझर्स हैदराबादला आरसीबीला 165 धावांवर रोखणं आवश्यक होतं. पण तसं काही करता आलं नाही. त्यामुळे हैदराबादचं टॉप 2चं गणित चुकलं आहे. आता एलिमिनेटर फेरीत खेळावं लागणआर आहे.

  • 22 May 2026 11:21 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : रजत पाटीदारचं अर्धशतक, आरसीबीचं पहिलं स्थान निश्चित

    आरसीबीचा कर्णघार रजत पाटीदार याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. यासह आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये साखळी फेरीनंतर आपलं पहिलं स्थान कायम राखणार असल्याचं निश्चित झालं आहे. यासह हैदराबादची टॉप 2 मध्ये येण्याची संधी हुकली आहे.

  • 22 May 2026 10:59 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : आरसीबी-हैदराबादमध्ये चुरस कायम, बंगळुरुच्या किती धावा?

    आरसीबी आणि हैदराबाद सामन्यात चुरस कायम आहे. आरसीबीने 13 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 127 धावा केल्या आहेत. रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या दोघेही प्रत्येकी 21 -21 धावा करुन नाबाद खेळत आहेत. आरसीबीला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये आणखी 129 रन्सची गरज आहे.

  • 22 May 2026 10:36 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : आरसीबीला तिसरा धक्का, देवदत्त पडीक्कल माघारी

    हैदराबादने आरसीबीला तिसरा झटका दिला आहे. एशान मलिंगा याने विराट कोहली याच्यानंतर देवदत्त पडीक्कल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. देवदत्तने 14 बॉलमध्ये 21 रन्स केल्या. देवदत्त आऊट झाल्याने आरसीबीचा स्कोअर 8.5 ओव्हरमध्ये 3 आऊट 94 असा झाला आहे.

  • 22 May 2026 10:14 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : आरसीबीला मोठा धक्का, विराट कोहली आऊट

    हैदराबादने आरसीबीला दुसरा आणि सर्वात मोठा झटका दिला आहे. साकीब हुसैन याने विराट कोहली याला स्मरण रवीचंद्रन याच्या हाती कॅच आऊट केलं. विराटने 11 बॉलमध्ये 15 रन्स केल्या.

  • 22 May 2026 10:07 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : आरसीबीला पहिला झटका, वेंकटेश अय्यर आऊट, एशान मलिंगाकडून शिकार

    एशान मलिंगा याने आरसीबीची सलामी जोडी फोडली आहे. एशानने वेंकटेश अय्यर याला अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. यासह वेंकटेशच्या खेळीचा शेवट झाला. वेंकटेश आणि विराटने पहिल्या विकेटसाठी 4.3 ओव्हरमध्ये 60 रन्स जोडल्या.

  • 22 May 2026 09:57 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : आरसीबीची संयमी सुरुवात, विराट-वेंकटेश जोडी जमली, हैदराबाद विकेटच्या शोधात

    विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर या सलामी जोडीने आरसीबीला संयमी सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी 256 रन्सचा पाठलाग करताना 3 ओव्हरमध्ये बिनबाद 34 रन्स केल्या आहेत. वेंकटेश 22 आणि विराट 11 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.

  • 22 May 2026 09:37 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : आरसीबीच्या बॅटिंगला सुरुवात, विराट-वेंकटेश मैदानात, 256 रन्सचं टार्गेट

    आरसीबीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर सलामी जोडी मैदानात आली आहे. हैदराबादने आरसीबीसमोब 256 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

  • 22 May 2026 09:26 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादच्या फलंदाजांचा तडाखा, आरसीबीसमोर 256 रन्सचं टार्गेट

    सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. हैदराबादसाठी एकूण तिघांनी अर्धशतकी खेळी केली. इशान किशन, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन या तिघांनी अर्धशतक झळकावलं. तर ट्रॅव्हीस हेड आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी छोटेखानी मात्र निर्णायक खेळी केली. त्यामुळे आता आरसीबी हा सामना जिंकणार की हैदराबाद रोखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 22 May 2026 09:06 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : क्लासेनच्या स्फोटक खेळीचा शेवट, हैदराबादला तिसरा झटका

    कृणाल पंड्या याने इशान किशन आणि हेनरिक क्लासेन सेट आणि स्फोटक जोडी फोडली आहे. कृणालने क्लासेनला वेंकटेश अय्यर याच्या हाती कॅच आऊट करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. क्लासेनने 24 बॉलमथ्ये 51 रन्स केल्या.

  • 22 May 2026 08:59 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : क्लासेन-किशनचा तडाखा, तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    हेनरिक क्लासेन आणि इशान किशन ही जोडी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई करत आहेत. या दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करुन तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. अशाप्रकारे हैदराबादच्या 15.2 ओव्हरमध्ये 200 धावा पूर्ण झाल्या आहेत.

  • 22 May 2026 08:44 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : क्लासेन-किशन जोडी जमली, हैदराबाद 150 पार

    हेन्रिक क्लासेन आणि इशान किशन जोडी जमली आहे. या दोघांनी हैदराबादला 13 ओव्हरनंतर 2 आऊट 156 रन्सपर्यंत पोहचवलं आहे.  इशान 38 आणि  क्लासेन 28 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 22 May 2026 08:28 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : इशान किशनकडून फटकेबाजीला सुरुवात, हैदराबाद मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

    इशान किशन याने फटकेबाजीला सुरुवात केली आहे. इशान आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी हैदराबादला 11 ओव्हरनंतर 2 आऊट 124 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. इशान 34 आणि क्लासेन 3 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.

  • 22 May 2026 08:15 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीचा शेवट, हैदराबादला दुसरा धक्का

    आरसीबीने हैदराबादला दुसरा झटका दिला आहे. सूयश शर्मा याने अभिषेक शर्मा याला कॉक्स याच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकने 56 धावांची खेळी केली. मात्र अभिषेक फटकेबाजीच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला.

  • 22 May 2026 08:08 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : इशान किशन-अभिषेक शर्मा जोडी जमली, आरसीबी दुसऱ्या विकेटच्या शोधात

    इशान किशन आणि अभिषेक शर्मा जोडी जमली आहे. या दोघांनी हैदराबादला 7 ओव्हरमध्ये 1 आऊट 77 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. इशान 9 आणि अभिषेक शर्मा 39 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 22 May 2026 07:49 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : रसीख सलाम डारकडून हैदराबादला पहिला झटका, हेड क्लीन बोल्ड

    रसीख सलाम डार याने हैदराबादला पहिला झटका दिला आहे. रसीखन ट्रॅव्हीस हेड याला क्लीन बोल्ड केलं. हेडने 16 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. हेडने या खेळीत 5 चौकार ठोकले.

  • 22 May 2026 07:45 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : हैदराबादची संयमी सुरुवात, हेड-अभिषेक गिअर बदलणार?

    ट्रॅव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने हैदराबादला संयमी सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये बिनबाद 33 धावा केल्या आहेत.  त्यामुळे आता हे दोघे गिअर बदलून फटकेबाजीला सुरुवात करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 22 May 2026 07:30 PM (IST)

    SRH vs RCB Live Score Updates : सामन्याला सुरुवात, हैदराबादची बॅटिंग, हेड-अभिषेक मैदानात

    सनरायझर्स हैदराबाज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला सुरुवात झाली आहे. हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हैदराबादकडून ट्रॅव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 22 May 2026 07:10 PM (IST)

    SRH vs RCB Live Updates : सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन

    सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रवीचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, एशान मलिंगा आणि साकिब हुसैन.

  • 22 May 2026 07:10 PM (IST)

    SRH vs RCB Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.

  • 22 May 2026 07:03 PM (IST)

    SRH vs RCB Live Updates : हैदराबादने टॉस जिंकला, आरसीबी विरुद्ध बॅटिंगचा निर्णय

    हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून आरसीबी विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हैदराबादसाठी टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

  • 22 May 2026 06:44 PM (IST)

    SRH vs RCB Live Updates : हैदराबाद-आरसीबी निर्णायक सामना, थोड्याच वेळात टॉस

    सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

  • 22 May 2026 06:33 PM (IST)

    SRH vs RCB Live Updates : सनरायझर्स हैदराबाद टीम

    सनरायझर्स हैदराबाद टीम: अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे, ट्रॅव्हिस हेड, लियाम लिव्हिंगस्टोन, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, क्रेन्स फुलेत्रा, ओंकार तरमले, आरएस अंबरीश आणि अमित कुमार.

  • 22 May 2026 06:31 PM (IST)

    SRH vs RCB Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम : जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, व्यंकटेश अय्यर, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार, जॉर्डन कॉक्स, अभिनंदन सिंग, स्वप्नील सिंग, कनिष्क चौहान, फिलिप सॉल्ट, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, सात्विक देसवाल, रिचर्ड ग्लीसन आणि जेकब डफी.

  • 22 May 2026 06:29 PM (IST)

    SRH vs RCB Live Updates : सनरायझर्सला टॉप 2 साठी शेवटची संधी, आरसीबीचं आव्हान

    सनरायझर्स हैदराबादला साखळी फेरीनंतर टॉप 2 मध्ये कायम राहायचं असेल तर आरसीबी विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. तसेच हैदराबादने हा सामना आवश्यक फरकाने जिंकल्यास ते टॉप 2 मध्ये पोहचतील. तसेच हैदराबादला अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधीही मिळेल. त्यामुळे राजीव गांधी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याकडे ताज्या आकडेवारीनुसार दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचं लक्ष असणार आहे. तसेच आरसीबी पहिल्या आणि हैदराबाद तिसऱ्या स्थानी आहे.

Published On - May 22,2026 6:28 PM

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल