Nagpur Protest : उच्चशिक्षित तरुणांचं हिंसक आंदोलन, नागपूर अधिवेशनावर धडकणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला अन्…
नागपूरमध्ये मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत ११ महिने प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांनी नोकरीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले आहे. सरकारने शब्द पाळला नाही, तसेच मानधनही दिले नाही असा आरोप करत या उच्चशिक्षित तरुणांनी पोलिसांशी झटापट केली.
नागपूर अधिवेशनादरम्यान उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत ११ महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही त्यांना नोकरी मिळाली नाही आणि सरकारने दिलेले मानधनही दिले नाही, असा त्यांचा आरोप आहे. या आंदोलनात पोलीस आणि आंदोलक तरुण यांच्यात झटापट झाली. या तरुणांनी सांगितले की, त्यांना ८,००० ते १०,००० रुपये मानधन मिळणार होते, परंतु तेही मिळाले नाही. मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नाही. सुरुवातीला चॉकलेट मोर्चा आणि झिरो माईल परिसरात ठिय्या आंदोलन केल्यानंतर, आता यशवंत स्टेडियममध्ये हे आंदोलन पेटले आहे. आंदोलक नोकरी देणारा सरकारी निर्णय (जीआर) तात्काळ काढण्याची मागणी करत आहेत. चर्चेसाठी सरकारकडून कोणताही प्रतिनिधी न आल्याने तरुणांचा संताप वाढला आहे.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला

