Anil Parab : सभागृहात आमच्या खुर्च्यांखाली काळा बॉक्स कशासाठी? अनिल परबांची तुफान टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
अनिल परब यांनी विधान परिषदेत बाकाखालील वायफाय राऊटरवरून मिश्किल टोला लगावला. त्यांना वायफायचा लाभ मिळत नसून, मोबाईलमधील डेटा बाहेर जात असल्याच्या भीतीने त्यांनी मिश्कील प्रश्न उपस्थित केला.
नागपूर येथे होत असलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत अनिल परब यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होतांना दिसतेय. अधिवेशनादरम्यान, सभागृहात बोलत असताना अनिल परब यांनी विधान परिषदेतील सभागृहातील त्यांच्या बाकाखाली लावलेल्या काळ्या बॉक्स (वायफाय राऊटर) संदर्भात मिश्किल टोला लगावला. अनिल परब म्हणाले सभागृहातील आमच्या बाकाखाली काळा बॉक्स कशासाठी? या वायफायचा काहीही फायदा मिळत नसल्याचे सांगत, “आमच्या मोबाईलमधून डेटा तिकडे जात नाहीये ना?” असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. सभागृहात सर्वच आमदारांच्या बाकाखाली हे वायफाय राऊटर लावण्यात आले असून, त्याच्या उपयोगाबाबत आणि संभाव्य डेटा सुरक्षिततेबाबत परब यांनी चिंता व्यक्त केली.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप

