AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray vs Shinde : गांडुळानं फणा काढायचा नसतो... गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर जहरी टीका...शिवसेनेकडूनही पटलवार

Thackeray vs Shinde : गांडुळानं फणा काढायचा नसतो… गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर जहरी टीका…शिवसेनेकडूनही पटलवार

| Updated on: Dec 13, 2025 | 2:52 PM
Share

ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केली. "गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांन फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो," असे ते म्हणाले. या टीकेला शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. नाव न घेता “गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांन फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो,” असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “गुलाम आणि गांडूळ ही प्रतिक्रिया ज्यांनी दिली, त्यांनाच ती लागू होते. गुलामाने 2022 मध्ये काय चमत्कार केला, हे आपण पाहिले आहे. तसेच, जर गांडूळ असता तर 2024 ची महायुतीची सत्ता परत आली नसती,” असे गोगावले म्हणाले. “शिंदे साहेबांचा आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. नार्वेकर यांच्यासोबत त्यांची अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ठाकरेंनी राम शिंदे यांचीही भेट घेतली. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता मिळावा, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. जर विरोधी पक्षनेते पद दिले जात नसेल, तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. संख्याबळाचा नियम पाळायचा असेल, तर उपमुख्यमंत्री पदाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे त्यांनी म्हटलं.

Published on: Dec 13, 2025 02:52 PM