AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात, कुठून लढणार निवडणूक?

कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समोर आले आहे. आता अभिजीत बिचुकले कुठून निवडणूक लढणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या सविस्तर...

कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात, कुठून लढणार निवडणूक?
Abhijit BichukaleImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 15, 2025 | 4:37 PM
Share

सध्या राज्यात नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात 246 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा करताच नगरपरिषदांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. अनेक उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरताना दिसत आहेत. दरम्यान, कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समोर आले आहे. आता अभिजीत बिचुकले कुठून निवडणूक लढणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कुठून निवडणूक लढणार?

नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. 17 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी साताऱ्याचे कवी मनाचे नेते, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील प्रथमच सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज भरल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

‘साताऱ्यामध्ये मागील 25 वर्षापासून रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची झालेली चाळण, बागांची दुरावस्था मी पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकलेल्या प्रतापसिंह हायस्कूलचे राष्ट्रीय स्मारक बनवायचंय बरोबरच साताऱ्याला सितारा बनवणार असल्याने सातारकरांनी मला नगराध्यक्ष बनवा‘, असे आवाहन बिचुकले यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे. मी माझी सौभ्यावती अलंकृता बिचुकले यांचा प्रचाक करत होतो. म्हणून काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करुन मला नोकरीवरुन काढले. एवढा मोठा अन्याय माझ्यावर झाला होता. सातारा नगरपालिकेतील सगळी अल्ली-पिल्ली बाहेर काढायची आहेत. अभिजित बिचुकले यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम कसा असणार?

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?