AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar Oath Taking Ceremony : नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ

Nitish Kumar Oath Taking Ceremony : आज नितीश कुमार यांनी रेकॉर्ड 10 व्यां दा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवलं आहे.

Nitish Kumar Oath Taking Ceremony : नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ
Nitish Kumar
| Updated on: Nov 20, 2025 | 12:16 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज बिहारमध्ये नितीश कुमार यांनी रेकॉर्ड 10 व्यां दा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. नितीश यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. मंचावर पीएम मोदींशिवाय अमित शाह, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते. शपथ ग्रहणाआधी जेडीयूच्या अनेक नेत्यांना मंत्रि‍पदासाठी फोन गेले. ज्या नेत्यांना फोन गेले, त्यात विजय चौधरी, श्रावण कुमार. विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मदन सहनी, जमा खान आणि लेशी सिंह हे नेते आहेत.

अशाच प्रकारे भाजपच्या कोट्यातून मंत्री बनणाऱ्यांमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्ह ही प्रमुख नावे आहेत. त्याशिवाय श्रेयसी सिंह, राम निषाद, सुरेंद्र मेहता, मंगल पांडे, नितिन नवीन, नारायण शाह, राम कृपाल, संजय टायगर, प्रमोद चंद्रवंशी, अरुण शंकर प्रसाद आणि दिलीप जैस्वाल ही नावं आहेत. नव्या सरकारमध्ये एनडीएचा घटक दलात भाजपच्या कोट्यातून सर्वाधिक 17 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. जनता दल यूनायटेडमध्ये 15 मंत्री बनले.

कोण-कोण मंत्री बनणार?

नव्या सरकारमध्ये कॅबिनेटबद्दल जी सहमती झालीय त्यानुसार, भाजपकडे स्पीकरशिवाय 17 मंत्रीपदं असतील. जेडीयूच्या कोट्यातून 15 मंत्री आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पार्टी (राम विलास पासवान) यांचे दोन, तर जीतन राम मांझी (HAM) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पार्टीचा (RLM) प्रत्येकी एक आमदार मंत्री बनेल. नितीश शिवाय सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

या दोन नेत्यांची मुलं होणार मंत्री

एलजेपी (आर) कोट्यातून संजय पासवान, राजू तिवारी आणि राजीव रंजन सिंह (डेहरी) यांची नावं सर्वात पुढे आहेत. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या हम (HAM) पार्टीमधून संतोष सुमन यांनाच मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. संतोष सुमन जीतन राम मांझी यांचा मुलगा आहे. मागच्या सरकारमध्ये सुद्धा तो मंत्री होता. याच प्रकारे उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाकडून (RLM) उपेंद्र यांचा मुलगा दीपक प्रकाश याचं नाव मंत्रि‍पदासाठी चर्चेत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.