AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Nitish Kumar Oath Taking Ceremony LIVE : बीड येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Nov 20, 2025 | 11:02 PM
Share

Nitish Kumar Bihar CM Swearing-in LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नितीश कुमार यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. विक्रमी 10 व्यांदा ते आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारआहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाला स्थान मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

CM Nitish Kumar Oath Taking Ceremony LIVE : बीड येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा सीसीटीव्हीत कैद
नितीश कुमार यांचा आज शपथविधी

बिहार विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार हे आज शपथ घेतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बिहार विधिमंडळ पक्षनेतेपदी नितीश कुमार यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण झाली. त्यानंतर नितीश कुमार हे आज 10 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पाटणा येथील गांधी मैदानात शपथविधी पार पडेल. या सोहळ्यासठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह अनेक महत्वाचे नेत उपस्थित राहतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Nov 2025 06:59 PM (IST)

    मीरा-भाईंदर उद्या स.8 ते दु. 4 वाजेपर्यंत पाणी बंद

    भाईंदरमध्ये उद्या सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. MIDC च्या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. मीरा-भाईंदरमध्ये शुक्रवारी, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • 20 Nov 2025 06:47 PM (IST)

    बीड येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा सीसीटीव्हीत कैद

    बीडच्या माजलगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सहाल चाऊस यांनी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शेख तौफिक यांनी सहाल चाऊस यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला होता. यानंतर सहाल चाऊस यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला. यानंतर सहाल चाऊस यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शेख तौफिक यांच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ करून मोठा राडा केला.या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.याप्रकरणी तहा असद चाऊस,जैद असद चाऊस यांच्यासह दहा ते पंधरा लोकांवर माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Nov 2025 06:27 PM (IST)

    मीरा-भाईंदरमध्ये मतदानात गडबड होऊ शकते, काँग्रेस नेत्याचा आरोप

    मीरा-भाईंदरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीतही मतदानात मोठी गडबड होऊ शकते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते दीपक बागडी यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, याआधी विधानसभा निवडणुकीत भाजप नगरसेवक विजय राय आणि त्यांच्या पत्नीचे नाव दोन मतदार याद्यांमध्ये असल्याचे उघड झाले होते.

  • 20 Nov 2025 06:15 PM (IST)

    मालेगाव : जरांगे यांनी चिमुरडीच्या पालकांची घेतली भेट

    मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन अत्याचारातून खून झालेल्या चिमुरडीच्या घरी जरांगे पाटील पोहचले आहेत. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांचे सांत्वन केले आहे.

  • 20 Nov 2025 05:05 PM (IST)

    वंचित बहुजन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज मागे

    वंचित बहुजन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज मागे

    वंचित बहुजन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार  संगीता हिरोळे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे

    आता बुलढाणा नगर परिषदेत तिरंगी लढत

  • 20 Nov 2025 04:44 PM (IST)

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, उद्या मालेगावात बंद

    मालेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

    उद्या मालेगावात बंदची हाक

    संपूर्ण मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय

    घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण शहर ठेवलं जाणार बंद

  • 20 Nov 2025 04:33 PM (IST)

    राज्यात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर आता मोक्का अंतर्गत कारवाई

    राज्यात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर आता मोक्का अंतर्गत कारवाई

    गुटखा,सुगंधी तंबाखू विक्री रोखण्यासाठी अन्न औषध मंत्रालयाचा मोठा निर्णय

    मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

    बनावट सुपाऱ्या बनवून गुटखा निर्मिती होत असल्याचा मंत्रालयाकडून खुलासा

  • 20 Nov 2025 04:22 PM (IST)

    जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड

    जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड

    साधना महाजन यांनी मानले जनतेचे तसेच या निवडणुकीतून माघार घेणाऱ्या विरोधकांचे आभार

    नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

    शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसची या निवडणुकीतून माघार

  • 20 Nov 2025 03:55 PM (IST)

    नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, सिमारामध्ये GEN-Z चा निषेध

    नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. सिमरा येथे जनरल-झेडचे निदर्शने सुरू आहेत. हिंसाचारानंतर, नेपाळमधील बारा येथे रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. बारा जिल्ह्यात जनरल-झेड आणि यूएमएलमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले.

  • 20 Nov 2025 03:38 PM (IST)

    अमेरिकेत मोस्ट वॉन्टेड गँगस्टर नोनी राणाला अटक

    भारतातील आणखी एक मोस्ट वॉन्टेड गुंड नोनी राणा याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. त्याला नायगारा सीमेवर अटक करण्यात आली. सूत्रांचे म्हणणे आहे की नायगारा ही अमेरिका आणि कॅनडाची सीमा आहे. तो अमेरिकेतून कॅनडाला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो तसे करण्यापूर्वीच त्याला अमेरिकन एजन्सींनी ताब्यात घेतले.

  • 20 Nov 2025 03:21 PM (IST)

    युक्रेन: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या पक्षात बंडखोरी

    रशियाशी युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये राजकीय गोंधळ तीव्र झाला आहे. अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी विरोधी पक्षांसह राष्ट्रीय एकात्मतेचे सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. झेलेन्स्की प्रशासनातील अनेक वरिष्ठ व्यक्तींविरुद्ध गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

  • 20 Nov 2025 03:20 PM (IST)

    पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई बंदी वाढवली

    पाकिस्तानी हवाई क्षेत्राच्या वापरावरील बंदी 24 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मागील NOTAM ची मुदत संपण्याच्या फक्त चार दिवस आधी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • 20 Nov 2025 02:55 PM (IST)

    अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद झाल्यानंतर थिटे कोर्टात जाणार

    अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद झाल्यानंतर थिटे कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्या विरोधात थिटे कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 20 Nov 2025 02:49 PM (IST)

    मी कुठेही शिस्तभंग केला नाही; रुपाली पाटलांचा खुलासा

    मी कुठेही शिस्तभंग केला नसल्याचा खुलासा रुपाली पाटलांनी केला आहे. रुपाली ठोंबरे पाटलांनी पक्षाकडेही खुलासा पाठवला. महिला डॉक्टरबाबत महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.

  • 20 Nov 2025 02:26 PM (IST)

    पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानींची चौकशी सुरु

    शीतल तेजवानींच्या जुन्या कार्यालयावर चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आली होती. तसेच पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानींची चौकशी सुरु आहे. पॉवर ऑफ अॅटर्नीच्या कागदपत्रांची चौकशी करणे सुरु आहे.

  • 20 Nov 2025 02:16 PM (IST)

    शीतल तेजवानींच्या जुन्या कार्यालयावर चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस

    शीतल तेजवानींच्या जुन्या कार्यालयावर चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. शीतल यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

  • 20 Nov 2025 01:52 PM (IST)

    करुणा मुंडे यांची भाजपवर टीका

    “छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीने लढण्यासाठी जशी तलवार दिली होती, त्याचप्रमाणे मलाही महाराष्ट्रात चाललेल्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवण्यासाठी शक्ती द्या असं साकडं मी तुळजाभवानीला घातले.इतक्या मोठ्या परिवाराची मी सून असताना मला स्वराज्य जनशक्ती नावाचा पक्ष काढून लढावं लागत आहे. तुळजापूर मध्ये ड्रग्ज प्रकरणांमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीला भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली” अशी टीका करुणा मुंडे यांनी केली.

  • 20 Nov 2025 01:32 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ बिनविरोध जिंकल्यानंतर काँग्रेस आक्रमक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ चिखलदरा नगरपरिषदेतून नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्यानतंर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. “मत चोरीचा भाग आता उमेदवार चोरीचा हा दुसरा भाग आहे” हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका. “जो माणूस तिथे राहत नाही. त्याचं नाव मतदार यादीत टाकलं जातं, हे मुख्यमंत्र्यांचे अशोभनीय काम आहे. याचा धिक्कार करतो याचा निषेध करतो” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

  • 20 Nov 2025 01:19 PM (IST)

    शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरु उद्धव ठाकरेंचा टोला

    सोनम वांगचुक यांच्या अटकेवरुन उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांना देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं. जे दिवटे निघालेत त्यांना मशालीच महत्व कळणार नाही. स्पर्धेच्या युगात मुलं आपलं मूळ विसरत आहेत. शिक्षणाचं स्वरुप कालांतराने बदलत गेलय. आम्ही पाटीवर अक्षर गिरवत मोठे झालो. बाबा मला मारलं असं म्हणत दिल्लीला गेले. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरु उद्धव ठाकरेंचा टोला.

  • 20 Nov 2025 12:58 PM (IST)

    बिलोली नगरपालिकेत भाजपची माघार

    बिलोली नगरपालिका निवडणुकीत भाजपाने एकही उमेदवार दिला नाही. भाजपातील इच्छुक उमेदवार दादाची राष्ट्रवादी व शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार डॉक्टर अजित गोपछेडे व आमदार जितेश अंतापुरकर यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपाची माघार दिसून आली. मराठवाडा जनहित पार्टी विरुद्ध काँग्रेस, दादाची राष्ट्रवादी व शिंदे गटात लढत होणार आहे. बिलोली नगरपालिकेसाठी भाजपाचा मराठवाडा जनहित पार्टीला पाठिंबा दिल्याची चर्चा होत आहे.

  • 20 Nov 2025 12:50 PM (IST)

    बिबट्याचा मुक्त संचार

    संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट घराच्या अंगणात दिसला. राजापूर शिवारातील ताजने मळा येथे बिबट्याचा मुक्त संचार आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याने दोन कोंबड्या फस्त केल्या. आज पहाटे पुन्हा भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

  • 20 Nov 2025 12:40 PM (IST)

    मराठी-हिंदी वादातून आत्महत्या?

    ट्रेन मधील गर्दीत, आगे हो असे हिंदीत बोलल्याने ‘मराठी बोलता येत नाही का?..मराठी बोलण्याची लाज वाटते का? असे विचारत चार ते पाच जणांच्या टोळक्याने 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणी नंतर धास्तावलेल्या १९ वर्षीय अर्णव खैरेने कल्याण कोळसेवाडी परिसरातील राहत्या घरी येताच गळफास घेतल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मक मृत्यू नोंद करत पोलिसांनी जितेंद्र खैरे याचा जबाब नोंदवत तपास सुरू केला आहे. अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स मध्ये पहिल्या वर्षाला शिकत असून. मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी घटना घडली असून वडिलांना फोन वरून त्याने मारहाणीची माहिती दिल्याचे सांगत वडिलांनी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला.

  • 20 Nov 2025 12:30 PM (IST)

    विजय कुंभार यांची सरकारवर टीका

    पुण्यात जेवढे घोटाळे झाले त्यात FIR झाल्या. जैन ट्रस्ट संदर्भात FIR झाली नाही पण व्यवहार रद्द झाला. पण कुणाल अटक नाही. असेच करत गेले तर ह्या घोटाळे कस होणार,अशाने राज्यात कुणीही जमीन घोटाळा करेल आणि परत देईल. शासनाला हे घोटाळे गंभीर वाटत नाही का असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला. ह्यात राजकीय नेत्यांची मुलं अडकली असल्यामुळे हे प्रकरण शांत करायचा प्रयत्न सुरू चालला आहे. पार्थ पवारला अटक करण्याची मागणी होते तर अजित पवारांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे.

  • 20 Nov 2025 12:20 PM (IST)

    किशोरी पेडणेकरांची मोठी टीका

    जे शिवसेनेसोबत भूतकाळात केलं, तेच आता भाजप शिंदे गटासोबत करीत आहे तपास यंत्रणांचा EDचा वापर केला, यांना पळवले आत्ता गरज संपली आहे, असा टोला उद्धव सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला. आधीपासूनच काही जण बंडासाठी तयार होते, पैशांचे प्रलोभन देऊन आमदार पळवले. राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप-काँग्रेस दोघांकडेच सामर्थ्य पण त्याचा भाजपने दुरुपयोग केला. सत्ता असताना सर्व खाती उद्धव ठाकरे यांच्या हातात होती, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या खातेयात कधीच ढवळाढवळ केली नाही पण त्यांनी विश्वासघात केला. परंतु आत्ताची परिस्थिती वेगळी एक सहीचेही ते धार्जिण नाहीत. महाराष्ट्रातील जनता आता या घडामोडींना नवीन मानत नाही. काही जण उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवर चढण्याचे स्वप्न बघत आहेत. त्यांना देशाचं पंतप्रधानही व्हायचंय, असे पेडणेकर म्हणाल्या.

  • 20 Nov 2025 12:10 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांची भाजपवर नाराजी

    जळगावच्या जामनेर येथे नगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेऊ नये असं वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेल्या असताना देखील असे प्रवेश होत असतील तरी चुकीचा आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जामनेर येथील नगरपालिका निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून त्यांनी माघार घेतली आहे.

  • 20 Nov 2025 12:00 PM (IST)

    आरोपांचे पुरावे द्या-राणा जगजितसिंह

    तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर असलेल्या आरोपांचे पुरावे द्या,भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजेंना आव्हान दिले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर ही आरोपी आहेत, त्या प्रकरणाची न्यायालयात हेरिंग का होत नाही. त्यांच्यावर ज्या – ज्या केसेस आहेत त्याच हेरींग का होत नाही कोर्टात ते सांगाव,खासदार ओमराजे ही स्वतः आरोपी आहेत असे राणा जगजितसिंह म्हणाले. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली होती

  • 20 Nov 2025 11:59 AM (IST)

    संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार 

    संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट घराच्या अंगणात शिरला. राजापूर शिवारातील ताजने मळा इथं बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याने दोन कोंबड्या फस्त केल्या होत्या. आज पहाटे पुन्हा भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • 20 Nov 2025 11:50 AM (IST)

    कल्याणमधील धक्कायक घटना

    ट्रेनमधील गर्दीत ‘आगे हो’ असं हिंदीत बोलल्याने ‘मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का? असं विचारत चार ते पाच जणांच्या टोळक्याने 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर धास्तावलेल्या १९ वर्षीय अर्णव खैरेने कल्याण कोळसेवाडी परिसरातील राहत्या घरी येताच गळफास घेतल्याचा धक्कादायक आरोप वडिलांनी केला.

  • 20 Nov 2025 11:40 AM (IST)

    सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांकडून समन्स

    सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहेत. सलीम शेख ड्रग्ज करणात ऑरीची चौकशी होणार आहे. ऑरी हा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घोळक्यात वावरणारा इन्फ्लुएन्सर आहे. एनडीपीएस प्रकरणात उद्या १० वाजता चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 20 Nov 2025 11:30 AM (IST)

    अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवकपदाचे उमेदवार सहलीला

    अक्कलकोट नगर परिषदेतील अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणून माघार घ्यायला लावत असल्याचा आरोप आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लू पाटील यांनी ही माहिती दिली. अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची काँग्रेस तालुका अध्यक्षांची माहिती आहे. आमच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा काँग्रेस तालुकाध्यक्षांचा आरोप आहे. तर प्रभाग क्रमांक 6 मधील उमदेवार निलेश लवटे कालपासून नॉट रिचेबल असल्याचाही दावा केला जातोय.

  • 20 Nov 2025 11:20 AM (IST)

    नगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांची नाराजी

    जळगावच्या जामनेर इथं नगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेऊ नये असं वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेलं असताना देखील असे प्रवेश होत असतील तर चुकीचं आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जामनेर येथील नगरपालिका निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून त्यांनी माघार घेतली आहे.

  • 20 Nov 2025 11:10 AM (IST)

    भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचं ओमराजेंना आव्हान

    तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर असलेल्या आरोपांचे पुरावे द्या, असं आव्हान भाजप आमदार राणा जगजित सिंह यांनी खासदार ओमराजेंना  दिलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकरही आरोपी आहेत, त्या प्रकरणाची न्यायालयात हिअरिंग का होत नाही?त्यांच्यावर ज्या – ज्या केसेस आहेत, त्यांची सुनावणी का होत नाही कोर्टात ते सांगावं, असा सवाल त्यांनी केला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्यावर टीका केली होती.

  • 20 Nov 2025 10:50 AM (IST)

    राष्ट्रीय महामार्गाच्या डंपरची धडक; मॉर्निंग वॉकला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

    जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम करणाऱ्या एका डंपरच्या भीषण धडकेत एका महसूल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाजी रघुनाथ महाजन (४२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते धरणगाव तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. महाजन हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना, भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर एरंडोल पोलीस ठाण्यात संबंधित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 20 Nov 2025 10:42 AM (IST)

    माजी आमदार रमेश कदम यांना मोठा दिलासा, कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून दोषमुक्त

    माजी आमदार रमेश कदम यांना दहा वर्षांपूर्वीच्या एका खटल्यातून कोल्हापूर उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१५ मध्ये त्यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या एका टिपर आणि जेसीबीला पकडले होते. त्यावेळी तहसीलदार घटनास्थळी न आल्याने कदम यांनी त्यांना शिवीगाळ केली होती. यावरून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा खटला पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण पंढरपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात प्रलंबित असताना, रमेश कदम यांनी दोषमुक्तीसाठी कोल्हापूर खंडपीठात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज मान्य करत त्यांना या खटल्यातून दोषमुक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

  • 20 Nov 2025 10:28 AM (IST)

    दादर कबूतर खान्यासाठी जैन मुनी पुन्हा आक्रमक, २८ नोव्हेंबरपासून आंदोलन करणार

    मुंबईतील दादर कबूतर खाना येथील कबुतरांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी सरकारला दिलेला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे संपला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारकडून केवळ लॉलीपॉप देण्यात आल्याची टीका जैन मुनींनी केली आहे. आता २८ नोव्हेंबरपासून दादर कबूतर खाना या ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मुक्या पक्षांच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनात हजारो जैन समुदायातील अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केले आहे.

  • 20 Nov 2025 10:16 AM (IST)

    अमरावतीत कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले फ्री फॅब रुग्णालय धुळखात

    अमरावती शहरात कोरोना महामारीच्या काळात सीएसआर फंडातून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले अत्याधुनिक फ्री फॅब रुग्णालय सध्या अक्षरशः धुळखात पडून आहे. एका बाजूला शहराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जागा नसल्यामुळे एकाच बेडवर दोन-दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ येत आहे, तर दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणारे हे कोट्यवधी रुपयांचे रुग्णालय दुर्लक्षामुळे झाडांच्या वेढ्यात अडकून पडले आहे. गरज असतानाही या अत्याधुनिक सुविधेचा वापर होत नसल्यामुळे शासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

  • 20 Nov 2025 10:04 AM (IST)

    कोपरगावात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

    कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-माहेगाव देशमुख शिवारात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने अखेर पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी याच बिबट्याने भाऊसाहेब वाघडकर (६२) आणि आशाबाई वाघडकर (५५) या दाम्पत्यावर दुचाकीवरून जात असताना अचानक हल्ला केला होता, ज्यात दोघेही जखमी झाले होते. या गंभीर घटनेनंतर संतप्त नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने तात्काळ परिसरात पिंजरा लावला. अथक प्रयत्नानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून, त्याला पुढील कार्यवाहीसाठी राहुरी येथील वनकार्यालयात हलवण्यात येणार आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

  • 20 Nov 2025 09:50 AM (IST)

    परंडा नगरपालिकेत अर्ज छाननी दरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी 24 जनावर गुन्हे दाखल

    शिंदेसेनेच्या उमेदवारास तीन अपत्ये असल्याने जनशक्ती आघाडीकडून घेण्यात आला होता आक्षेप. शिवसेना सावंत गट आणि राहुल मोटे गट आले होते आमने सामने, नगर पालिकेच्या गेटवर करण्यात आली होती दगडफेक, आचारसंहिता उल्लंघन व कामकाजात अडथळा आणल्या कारणावरून परंडा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन्ही गटातील २४ जणांवर केला गुन्हा दाखल

  • 20 Nov 2025 09:40 AM (IST)

    पक्ष विरोधी कारवाई केल्याने पक्षातून हकालपट्टी.

    उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निष्ठावान सैनिकांची हकालपट्टी. पक्षाने हकालपट्टी केल्याने शिवसैनिकांच्या डोळ्यात आश्रू. पत्रकार परिषदेत शिवसैनिक ढसाढसा रडले..राहाता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे , माजी नगरसेवक सागर लुटे , उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी…

  • 20 Nov 2025 09:30 AM (IST)

    निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईने गोंधळ

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषद मध्ये भाजप कडून एकाच जागेसाठी दोन जणांना दिले एबी फॉर्म. प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवकाच्या सर्वसाधारण जागेसाठी भाजपाने दोन उमेदवारांना दिले होते एबी फॉर्म. सचिन जायदे आणि अजय पसारी यांना देण्यात आला होता भाजप कडून एबी फॉर्म. सचिन जायदे यांचा उमेदवारी अर्ज ठरवला अवैध त्यामुळे अजय पसारी यांची उमेदवारी कायम..

  • 20 Nov 2025 09:20 AM (IST)

    40 हजार हेक्टर वरील रब्बी हंगामातील पेरणीचा टप्पा पूर्ण

    भोकरदन तालुक्यात 40 हजार हेक्टर वरील रब्बी हंगामातील पेरणीचा टप्पा पूर्ण. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू,ट्रॅक्टर आणि बैलाद्वारे पेरण्यांना सुरुवात. खरीप हंगामात पावसाने उडवून दिली होती दानादान, आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून अपेक्षा

  • 20 Nov 2025 09:10 AM (IST)

    कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन करणार तपोवन परिसराची पाहणी

    तपोवन परिसरातील झाडं तोडण्यासाठी काल झाला होता विरोध. तपोवन परिसरात साधुमंतांसाठी साधू ग्रामची उभारणी करण्यासाठी काही झाड तोडण्याचा झाला होता निर्णय. याच निर्णयाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी झाडांना मिठी मारून काल केले होते आंदोलन

  • 20 Nov 2025 09:05 AM (IST)

    वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

    अप्पा शिंदे यांच्या मळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून होता बिबट्याचा वावर. वन विभागाकडून लावण्यात आला होता पिंजरा. याच बिबट्याने यापूर्वी अनेक कुत्रे केले होते फस्त. अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या झाला जेरबंद

  • 20 Nov 2025 08:50 AM (IST)

    जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तूर पिकावर बुरशीजन्य आणि कीड रोगाचा प्रादुर्भावाची शक्यता

    जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमानात घट झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे गारवा देखील निर्माण झालाय, मात्र यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात तुर पिकावर बुरशीजन्य आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा महागडे औषध फवारण्याची वेळ आली आहे.  ढगाळ वातावरण आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

  • 20 Nov 2025 08:22 AM (IST)

    सांगतीलील 10 वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या

    सांगतीलील 10 वीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत आत्महत्या केली.  शौर्य प्रताप पाटील असे त्याचे नाव आहे. .मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरून खाली रस्त्यावर उडी मारुन त्याने आयुष्य संपवलं. शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी मुख्याध्यापकांसह 2 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पार्थिवावर आज मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 20 Nov 2025 08:18 AM (IST)

    नाशिक – मोरे मळा परिसरात बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

    नाशिकच्या मोरे मळा परिसरात बिबट्या अखेर जेरबंद झाला आगहे. अप्पा शिंदे यांच्या मळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. याच बिबट्याने यापूर्वी अनेक कुत्रे फस्त केले होते. अखेर तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. त्यामुळे मोरे मळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला

  • 20 Nov 2025 08:06 AM (IST)

    बिहार : गांधी मैदानात आज होणार नव्या सरकारचा शपथविधी

    पाटण्याच्या गांधी मैदानात आज नव्या सरकारचा शपथविधी होणार असून पंतप्रधानांसह अनेक मान्यवर नेते या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज सुमारे 20 मंत्री देखील शपथ घेऊ शकतात.

  • 20 Nov 2025 07:59 AM (IST)

    नितीश कुमार यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

    पाटणा येथे नितीशकुमार यांचा शपथविधी पार पडणार असून या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहणार आहेत. तसेच गृहमंत्री अमित शाह यांचीदेखील विशेष उपस्थिती आजच्या सोहळ्यासाठी असेल.

  • 20 Nov 2025 07:56 AM (IST)

    नितीश कुमार घेणार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

    बिहारचे मुख्यमंत्री म्हणून संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार गुरुवारी विक्रमी दहाव्या वेळी शपथ घेणार आहेत. पाटणा येथील गांधी मैदानावर आज सकाळी 11.30 वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

Published On - Nov 20,2025 7:55 AM

Follow us
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.