AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचं आता कसं होणार? इराण-इस्त्रायल युद्धाची सर्वात मोठी झळ, काय असणार पाकचा निर्णय?

अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश इराणविरोधात एकत्र आले आहेत. या युद्धाचा मोठा परिणाम जगावर होत आहे. पाकिस्तानची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. आता नेमकं काय झालं आहे चला जाणून घेऊया...

पाकिस्तानचं आता कसं होणार? इराण-इस्त्रायल युद्धाची सर्वात मोठी झळ, काय असणार पाकचा निर्णय?
Pakistan PMImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 07, 2026 | 1:05 PM
Share

गेल्या आठ दिवसांपासून इराण विरोधात इस्त्रायल आणि अमेरिका हे दोन्ही देश एकत्र आले आहेत. इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला केला. या हल्ल्याचे प्रतित्तूर म्हणून इराणने आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली. त्यानंचक इराणने होर्मुझ हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे याचा जगातील अनेक देशांवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक परिणाम हा पाकिस्तान या देशावर झाला आहे. या देशाची अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे.

पाकिस्तान सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या गंभीर कमतरतेशी झगडत आहे. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वाह, पंजाब (पाकिस्तान) आणि सिंधसह अनेक भागांत लोक पेट्रोल पंपवर इंधन मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप रिकामे पडले आहेत आणि लोकांना लांब रांगा लावूनही पेट्रोल-डीझेल मिळत नाही. याच दरम्यान पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नव्या किंमतीनुसार हाय स्पीड डिझेलची किंमत ३३५ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर आणि सामान्य पेट्रोलची किंमत ३२१ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाली आहे.

अहवालानुसार, पाकिस्तान आपल्या एकूण तेल गरजेच्या सुमारे ३५ टक्के भाग अवैध मार्गाने ईरानमधून येणाऱ्या तेलाने पूर्ण करतो. सर्वाधिक परिणाम बलुचिस्तानात दिसत आहे. तिथे सुमारे ८० टक्के पेट्रोल आणि डिझेलची गरज इराणी तेलाने पूर्ण होते. त्याचप्रमाणे सिंधमध्ये सुमारे २० टक्के, खैबर पख्तूनख्वाहमध्ये सुमारे 18 टक्के आणि पंजाबमध्ये सुमारे १३ टक्के तेलाची गरज इराणमधून येणाऱ्या तेलाने पूर्ण होते. इराणी तेल इतर देशांच्या तेलाच्या तुलनेत खूप स्वस्त असते, म्हणून पाकिस्तानच्या अनेक भागांत त्याचा वापर जास्त आहे.

मिडल ईस्टमुळे तेल पुरवठ्यावर परिणाम

मिडल ईस्टमधील वाढते युद्ध आणि होर्मुझ जलडमरूमध्य प्रभावित होण्यामुळे तेल पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की त्याच्याकडे सुमारे २४ दिवसांचा पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे, पण युद्धाच्या परिस्थितीमुळे इतर मार्गांनी तेल पुरवठा योग्य रीतीने होत नाही. याशिवाय इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेथून येणारे पेट्रोल-डीझेल पाकिस्तानपर्यंत पोहोचत नाही. याचा सर्वाधिक परिणाम बलुचिस्तानात दिसत आहे, जिथे ७० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंप रिकामे असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात तेलाच्या किंमती

दुसरीकडे, भारतात सध्या या संकटाचा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर मोठा परिणाम झालेला नाही. अलीकडेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले होते की भारताकडे सुमारे ७४ दिवसांचा तेल साठा उपलब्ध आहे. याशिवाय अमेरिकेने भारताला रशियातून ३० दिवस तेल खरेदी करण्याची सूट दिली आहे, ज्यामुळे भारत रशियातून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करू शकतो. सध्या भारतातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सामान्य आहेत, कोणत्याही प्रकारची नवीन वाढीची घोषणा केलेली नाही.

भारतातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डीझेल किंमती (६-७ मार्च २०२६)

  • दिल्ली – पेट्रोल ९४.७७, डिझेल ८७.६७
  • मुंबई – पेट्रोल १०३.५०, डिझेल ९०.०३
  • पटना – पेट्रोल १०६.३०, डिझेल ९१.४९
  • कोलकाता – पेट्रोल १०५.४१, डिझेल ९२.०२
  • चेन्नई – पेट्रोल १००.८०, डिझेल ९२.३९
  • बेंगळुरू – पेट्रोल १०२.९६, डिझेल ९०.९९

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य