नितीश कुमार
बिहार विधानसभेचा निकाल लागला असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपासह जेडीयूने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. तर, या निवडणुकीत आरजेडी आणि कॉंग्रेसचा धुव्वा उडाला आहे. राज्यात पुन्हा एकदा एनडीएचा मुख्यमंत्री होणार आहे. पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांच्याच गळ्यात माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीशकुमारांच्या जेडीयूकडून मुख्यमंत्रिपदासाठी दावाही केला जात आहे. म्हणूनच एनडीएचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 2020 च्या निवडणुकीत नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. 2022 मध्ये ते पुन्हा एनडीए सोडून महाआघाडीत सामील होऊन मुख्यमंत्री झाले होते. जानेवारी 2024 मध्ये नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा महाआघाडी सोडली आणि भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नवव्यांदा मुख्यमंत्री बनले. आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10 व्यादा ते शपथ घेऊ शकतात.
CM Nitish Kumar: केवळ 21 हजारांची रोख रक्कम,13 गायी, पाटण्यात नावावर घरही नाही, नितीश कुमार यांची संपत्ती किती?
CM Nitish Kumar Networth: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दरवर्षी त्यांच्या संपत्तीचे विवरण जाहीर करतात. बिहार सरकारच्या संकेतस्थळानुसार, त्यांची एकूण चल-अचल संपत्ती जवळपास 1.65 कोटी इतकी आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 11:49 am
Bihar Nitish Kumar: बिग ब्रदर असूनही भाजपच्या पदरात हे काय? मिळाले ते पद, जे घटनेतच नाही
Nitish Kumar Cabinet: भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात सम्राट चौधरी यांना नेता तर विजय सिन्हा यांना उपनेता म्हणून निवडल्या गेले. हे दोन्ही यावेळी भाजपचे बिहारमधील उपमुख्यमंत्री असतील.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:58 am
Nitish Kumar: पहिल्यांदा पराभवाचा सामना आता दहाव्यांदा मुख्यमंत्री; धुरंधर नितीश कुमार यांचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 am
CM Nitish Kumar Oath Taking Ceremony LIVE : बीड येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा सीसीटीव्हीत कैद
Nitish Kumar Bihar CM Swearing-in LIVE : बिहार विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर नितीश कुमार यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. विक्रमी 10 व्यांदा ते आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारआहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाला स्थान मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
- manasi mande
- Updated on: Nov 20, 2025
- 11:02 pm
Nitish Kumar Oath : ठरलं! बिहारच्या मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी, नितीश कुमार… महाराष्ट्रातून कोण लावणार हजेरी?
बिहारमध्ये नितीश कुमार उद्या दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री असतील.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 19, 2025
- 5:24 pm
Bihar Next CM : बिहारचं ठरलं, कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
निवडणुकीच्या निकालानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण मुख्यमंत्री होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 5:20 pm
Bihar Election 2025: नितीशबाबूंची एक चाल नि जेडीयूत मोठी फूट? भाजप पण कच्च्या गुरूचा चेला नाही, मुख्यमंत्री पदावरून पडद्याआड काय घडामोडी?
Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीचे कवित्व अजून संपलेले नाही. सध्या 'ही दोस्ती तुटायची नाय' असा सूर नितीश बाबू आणि भाजपने आळवला असला तरी मुख्यमंत्री पदावरून सस्पेन्स सुटलेला नाही. अगोदर नितीश बाबूंचे नाव चर्चेत होते, पण निकाल आल्यानंतर चित्र पालटले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 15, 2025
- 1:17 pm
Bihar Election Result 2025: मोठी बातमी! महाविजयानंतरही बिहारमध्ये सत्तेत येऊ शकते बिगर भाजप सरकार, हे गणित समजून घ्या
Landslide Victory Non BJP Government: बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त) या महायुतीने महाआघाडीचा धुव्वा उडवला. भाजप या निवडणुकीत बिग ब्रदर ठरला. तर जेडीयू दुसरी सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. पण सत्ता स्थापनेवरून एक खेला होऊ शकतो, हे गणित तुम्हाला माहिती आहे का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 15, 2025
- 8:58 am
Nitish Kumar : ऐकून आश्चर्य वाटेल, पण.. मागच्या 20 वर्षात एकही निवडणूक न जिंकता नितीश कुमार बनले मुख्यमंत्री
बिहारच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं सातत्याने टाळलं आहे. त्यांनी 1985 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. परंतु नंतर त्यांनी विधान परिषदेद्वारे राज्य करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक लढवण्याचं टाळलं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 16, 2025
- 10:53 am
Bihar Election Result 2025: बडे बेआबरू होकर…MIM ने राष्ट्रीय पक्षाला पण टाकले मागे, इतक्या जागांवर काँग्रेस आघाडीवर
AIMIM lead in Bihar Election 2025: बिहार निवडणुकीतील निकालाने काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. बिहारमध्ये काँग्रेसने मित्रांना पण झटका दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस परजीवी झाल्याचा चिमटा बिहारमध्ये सत्ताधारी काढत आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 14, 2025
- 1:54 pm
Bihar Election Result 2025: तर बिहारमध्ये महाराष्ट्राचा फॉर्म्युला लागू होणार? शिंदेंच्या वाटेवर नितीश कुमार? भाजपच्या मनात काय? काय घडू शकतं?
Nitish Kumar-Eknath Shinde: एनडीएमध्ये सध्या बिग ब्रदरची लढाई सुरू आहे. एनडीएने महाआघाडीचा सुपडा साफ केला आहे. कलाचा आकडा पाहता भाजप 85 तर जेडीयू 78 जागांवर आघाडीवर आहे. पण यामुळे मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 14, 2025
- 12:57 pm
Bihar Election Results 2025: टायगर अभी जिंदा है! या 11 कारणांमुळे NDAचा महाविजय, झटपट जाणून घ्या
Nitish Kumar JDU Big Leap: भाजपची शांतेत महिला क्रांतीची जादू बिहारमध्ये पण चालली. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार सरकार येत आहे. गेल्या 20 वर्षांपासूनची त्याची राजकीय पकड ढिल्ली झाली नसल्याचे दिसून आले. या महाविजयाची ही आहेत मोठी कारणं...
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 14, 2025
- 12:05 pm
Bihar Election Results 2025: पुन्हा नितीश कुमारच, भाजपचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं? सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला बहुमत?
Bihar Election Results 2025: बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार हेच बाहुबली ठरताना दिसत आहेत. सुरुवातीचे जे कल येत आहेत. त्यात पुन्हा नितीश सरकारच सत्तेत येताना दिसत आहे. तर भाजपलाही झुंजवत नितीश कुमार यांच्या जेडीयूने मोठी मजल मारली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 14, 2025
- 10:41 am
Bihar Election Results 2025: बिहारमध्ये मोठा ‘खेला’? शेअर बाजार सकाळच्या सत्रात दणकावून आपटला, मोठे संकेत काय?
Bihar Election Results 2025: बिहारमध्ये सध्या NDA 137 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही 96 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कौलमुळे काटें की टक्कर स्पष्ट दिसत आहे. त्यातच शेअर बाजाराने मोठे संकेत दिले आहेत. बिहारमध्ये 'खेला' होणार?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 14, 2025
- 10:27 am
Bihar Election Results 2025 : 40 टक्के महिला मतदारांच्या हातात 10 हजारांची चावी; NDA च्या सत्तेचा राजमार्ग प्रशस्त करणार?
Bihar Election Results 2025 : बिहार निवडणुकीत महिला मतदार करिष्माई कामगिरी दाखवण्याची शक्यता आहे. त्यांना एनडीएने दहा हजारांचा आर्थिक पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत निर्णयाक असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 14, 2025
- 10:26 am