AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-अमेरिका युद्धात भारताने जे केले ते कोणीही करून शकले नाही… भारताचा मोठा विजय, थेट यूएईमधून…

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. यादरम्यान एक अत्यंत मोठी बातमी पुढे येत आहे. भारताने मोठे यश या युद्धादरम्यान मिळाले आहे. इतर कोणत्याही देशाला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले आहे.

इराण-अमेरिका युद्धात भारताने जे केले ते कोणीही करून शकले नाही... भारताचा मोठा विजय, थेट यूएईमधून...
India
| Updated on: Mar 16, 2026 | 9:18 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. युद्ध अधिक पेटले आहे. पाकिस्तानसह अन्य काही देशांमध्ये गॅस आणि कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा आहे. भारतातही एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. परिस्थिती अधिक बिकड होत आहे. इराणकडून भारताकरिता होर्मुज खाडी खुली ठेवण्यात आली असून भारताला सुरक्षित मार्ग इराण देत आहे. होर्मुज खाडीत मोठा जाम लागला असून अनेक हल्ले केले जात आहेत. दिसेल त्या जहाजाला उडवले जात आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करून अमेरिकेची नाकेबंदी करण्यात आली. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती अस्थिर झाल्या असून याचा मोठा फटका अमेरिकेला बसत आहे. इराणसोबत युद्ध सुरू करून अमेरिका चांगलीच फसल्याचे दिसत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांचा अमेरिकेवर मोठा दबाव आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात हाहाकार उडाला.

भारत या युद्धाच्या स्थितीमध्ये आपली ताकद जगाला दाखवताना दिसत आहे. इराण युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पण या मार्गाने भारताचे जहाज सुरक्षित येताना दिसत आहेत. इतर देशांसाठी हा मार्ग इराणकडून पूर्णपणे बंद करण्यात आला. होर्मुजची सामुद्रधुनी खुली ठेवणे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरबच्या अमिरातीतील फुजेराह तेल टर्मिनलवर मोठा हल्ला झाला. विशेष म्हणजे ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी भारताचे तेलवाहू जहाज जग लाडकी तिथेच होते आणि यादरम्यान त्याला सुरक्षित काढण्यात आले. भारतात परतण्याचा प्रवास सुरू केला आहे. हल्ला सुरू असताना भारताचे जहाज तिथेच होते.

फुजैराह ऑइल टर्मिनलवर हल्ला झाला तेव्हा जग लाडकी हे भारतीय जहाज सिंगल पॉइंट मूरिंग येथे कच्चे तेल भरत होते. जहाज सुरक्षित असून सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.  रविवारी सकाळी भारतीय वेळेनुसार सुमारे 10.30 वाजता जहाज फुजैराहहून सुरक्षितपणे निघाले. जहाज अंदाजे 80,800 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन भारताकडे येत आहे. पूर्ण सुरक्षेमध्ये भारताच्या दिशेने जहाजाला आणले जात आहे. हा भारताचा सर्वात मोठा विजय म्हणाला लागेल. कारण हे जहाज होर्मुजची खाडी ओलांडून पुढे निघाले आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले