AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची या मित्राने सोडली साथ, मोठा दणका, थेट खडसावत…

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने अचानक मोठा हल्ला इराणवर केला. मात्र, आता हे युद्ध जोरदार पेटले असून अमेरिका कुठेही या युद्धात मागे पडताना दिसत आहेत. यादरम्यानच अमेरिकेला मोठा दणका बसला आहे.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची या मित्राने सोडली साथ, मोठा दणका, थेट खडसावत...
America and Turkey
| Updated on: Mar 16, 2026 | 8:38 AM
Share

इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला केला. यानंतर थेट युद्ध पेटले. इराणच्या सर्वाेच्च नेत्याला अमेरिकेने आणि इस्त्रायलने हल्ल्यात ठार केले. यानंतर हे युद्ध अधिक भडकताना दिसले. आज अमेरिका आणि इराण युद्धाचा 17 वा दिवस आहे. इराणकडून आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळाला टार्गेट करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, अशी भूमिका जगातील अनेक देशांची आहे. मात्र, आता अमेरिका या युद्धात इतरही देशांना उतरवण्याच्या तयारीत आहे. इराणकडून या युद्धादरम्यान होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अमेरिका, इस्त्रायल आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या देशांकरिता इराणकडून ही खाडी बंद करण्यात आली. यामुळे मोठा हाहाकार उडाला. अनेक देशांमध्येच गॅस आणि तेल संपले आहे. इराणकडून एकप्रकारचे शस्त्र म्हणून होर्मुज सामुद्रधुनीचा वापर केला जात आहे. इराणच्या या निर्णयामुळे अनेक देश संकटात आहेत. अमेरिकेला देखील या युद्धाचा थेट फटका बसताना दिसत आहे.

या युद्धाचा इराण आणि इस्त्रायलसोबतच इराणच्या शेजारी देशांना मोठा फटका बसला आहे. थेट त्यांच्या देशात इराणचे लष्कर तळ असल्याने इराण हल्ले करत आहे. यादरम्यानच आता तुर्कीने अमेरिकाला मोठा धक्का दिला आहे. तुर्कीने शनिवारी अमेरिकेवर चर्चेदरम्यान इराणशी विश्वासघात केल्याचा थेट मोठा आरोप केला आहे. तुर्की आणि अमेरिका नाटो सदस्य असूनही कलम 5 ने बांधील आहेत. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान म्हणाले की, अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतेही चर्चा झाली नाही.

सध्या जी काही परिस्थिती आहे, त्यामधून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न तुर्की करताना दिसत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी तुर्कीने दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यानच इराणकडून तुर्कीवरही क्षेपणास्त्र टाकण्यात आली. मात्र, आता नुकताच तुर्कीने स्पष्ट केले की, आपल्याला या युद्धात तटस्थ राहायचे आहे.

हा अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे. कारण अमेरिकेला वाटत होते की, तुर्की या युद्धात आमच्या बाजूने उभी राहिल. मात्र, तुर्कीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीवर बोलताना म्हटले की, सध्या जी काही परिस्थिती आहे ती राजनैतिक कूटनितीसाठी फार काही अनुकूल नक्कीच नाही. इराणी लोक त्यांच्या अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी चर्चा करत असताना दुसऱ्यांदा हल्ला झाल्यामुळे त्यांना विश्वासघात झाल्याचे वाटत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल