AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम महिलेसोबत या मुख्यमंत्र्यांची लाजिरवाणी वागणूक… काँग्रेसपासून शिवसेना (UBT) नेत्यांनी साधला निशाणा

Video Viral : डॉक्टर मुस्लीम महिलेला या मुख्यमंत्र्यांनी आधी विचारल हे काय? त्यानंतर..., मुख्यमंत्र्यांच्या लाजिरवाणी वागणुकीवर काँग्रेसपासून शिवसेना (UBT) नेत्यांनी साधला निशाणा

मुस्लीम महिलेसोबत या मुख्यमंत्र्यांची लाजिरवाणी वागणूक... काँग्रेसपासून शिवसेना (UBT) नेत्यांनी साधला निशाणा
मुख्यमंत्री नितीश कुमार
| Updated on: Dec 16, 2025 | 2:31 PM
Share

Video Viral : सोशल मीडियावर सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांसमोर एका डॉक्टर मुस्लीम महिलेचा बुरखा ओढला आहे. ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 15 डिसेंबर रोजी, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देत होते, तेव्हा त्यांनी त्यापैकी एका नुसरत नावाच्या महिला डॉक्टरचा बुरखा ओढला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लाजिरवाण्या वागणुकीवर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसपासून शिवसेना (UBT) नेत्यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी संताप व्यक्त करत म्हणाले, नितीश कुमार आणि भाजपला लाज वटली पाहिजे… कोणता व्यक्ती मानसिक रित्या स्थिर असले तर, त्याला कोणत्याच महिलेचा पदर आणि बुरखा ओढण्याचा अधिकार नाही… काँग्रेस प्रवक्ते उदित राज म्हणाले, नितीश कुमार मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत आणि त्यांनी अनेक वेळा असं वर्तन केलं आहे. एनडीए नेते असेच आहेत.

RJD खासदार प्रकरणावर संताप व्यक्त करत म्हणाले, ‘मी व्हिडीओ पाहिले आहेत… मन सुन्न करणारे त्यामधील दृश्य आहेत… उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. हा एक चिंतेचा विषय आहे… व्हिडीओ समाजाला चांगला संदेश देत नाहीये, चिंता निर्माण करत आहे…’

शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “हे पूर्णपणे लज्जास्पद आहे. हे निव्वळ छळ आहे आणि त्यांनी माफीमागितली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना कोणाचाही बुरखा ओढण्याचा अधिकार नाही.”

समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, नितीश कुमार मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे…’, तर अवेधश प्रसाद म्हणाले, ‘हे बिहारचं दुर्भाग्य आहे… नितीश कुमार यांनी यापूर्वी देखील असं कृत्य अनेकदा केलं आहे…’, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे राजकारणातील वातावरण देखील चांगलंच तापलं आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट