AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final: फलंदाज की गोलंदाज! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रथम फलंदाजी की गोलंदाजी हे खेळपट्टीवरून ठरणार आहे.

IND vs NZ Final: फलंदाज की गोलंदाज! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार?
IND vs NZ Final: फलंदाज की गोलंदाज! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार?Image Credit source: Money 9 वरून
| Updated on: Mar 07, 2026 | 4:36 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी होणार असून भारत आणि न्यूझीलंड संघात लढत होईल. असं असताना या सामन्यात नाणेफेकीचा कौल आणि खेळपट्टीचा अंदाज महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाल, काळी आणि मिश्र मातीच्या तीन खेळपट्ट्या आहे. प्रत्येक खेळपट्टीचं महत्त्व आहे. अंतिम सामन्यात कोणती खेळपट्टी वापरली जाणार यावरून नाणेफेकीनंतर फलंदाजी की गोलंदाजीचा निर्णय घेतला जाईल. काळ्या मातीची खेळपट्टी सामना सुरू झाल्यानंतर हळू हळू मंदावत जाते. त्यामुळे दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांना मदत होते. लाल मातीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते. कारण या खेळपट्टीवर उसळी मिळते. त्यामुळे या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो. त्यामुळे हाय स्कोअरिंग सामना होतो. भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर झाला होता. हा सामन्यात भारताच्या वाटेला दुसरी फलंदाजी आली होती. तेव्हा भारताने सामना गमावला होता.

खेळपट्टीचा अंदाज काय?

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी मिश्र मातीची खेळपट्टी वापरली जाणार आहे. लाल आणि काळ्या मातीचं मिश्रण असणार आहे. ही खेळपट्टी सुरूवातील फलंदाजांना मदत करते. त्यानंतर गोलंदाजांना मदत होते. पण ही खेळपट्टी अद्याप निश्चित झालेली नाही. कारण प्रसारकांना अजूनही स्टम्प कॅमेरे बसवलेले नाहीत. पण स्थानिक क्यूरेटरचं या खेळपट्टीवर बारीक लक्ष आहे. ते वारंवार या खेळपट्टीची पाहाणी करत आहेत. ग्राउंड स्टाफकडूनही या खेळपट्टीवर काम होत आहे. त्यामुळे हीच खेळपट्टी असण्याची शक्यता वाढली आहे. बीसीसीआयच सीईओ हेमांग अमीन यांनी खेळपट्टीवर कव्हर करण्यापूर्वी याचं बारकाईने निरीक्षण केलं होतं.

मिश्र मातीच्या खेळपट्टीवर दक्षिण अफ्रिका आणि कॅनडा यांच्यात सामना झाला होता. हा सामना 9 फेब्रुवारीला झाला होता. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 213 धावा केल्या आणि 53 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणं फायद्याचं ठरू शकते. पण दुसऱ्या डावात दव फॅक्टरही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. एकंदरीत या खेळपट्टीबाबत सांगायचं तर, ही खेळपट्टी भारत इंग्लंड उपांत्य सामन्यासारखी असेल. फार तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या थोडाफार लाभ मिळू शकतो.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...