अंजली भारती यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी झालेल्या भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचारांवर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी अंजली भारती यांची जीभ घसरली. यावेळी अंजली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव घेत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले.
भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी झालेल्या भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचारांवर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी अंजली भारती यांची जीभ घसरली. यावेळी अंजली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव घेत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध नोंदवला आहे. या प्रकरणावर महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. अंजली भारतीवर कारवाई करण्याचे भंडारा पोलीसांना निर्देश देण्यात आले आहे. आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी असे महिला आयोगाने निर्देश दिलेत. मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?

