Maharashtra Election News LIVE : मुंबई विमानतळ परिसरात ड्रोन आढळून आल्याने खळबळ
Live Updates in Marathi : नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या 30 हून अधिक सभा होणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली
अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी होणार महापौर पदाची निवड. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचा पत्र विभागीय आयुक्तांनी काढले होते. पण आज नवीन पत्र काढून ही निवडणूक आता 6 फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आली आहे.
-
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी रोज संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत गावकऱ्यांनी मोबाईल न वापरण्याचा, टीव्ही न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी घेण्यात आला निर्णय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या नूतन संकल्पनेचे ग्रामस्थांकडून स्वागत.
-
-
धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना–भाजपमधील तणावावर तोडगा
धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना–भाजपमधील तणावावर तोडगा निघाला आहे. जिल्हा परिषदेच्या 23 जागा तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती सरनाईकांनी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर अखेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांसाठी समतोल राखण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर काही ठिकाणी पावसाची हजेरी
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने विविध भागात पाऊस पडण्याचा इशारा दिला होता.
-
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी आहे. वकील नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी याचिका दाखल केली होती. वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
-
-
डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई
डोंबिवलीत अन्न आणि औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात छापा टाकून मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला ‘टेल्मा एम’ नावाच्या औषधांची बनावट कंपनी उभारून डोंबिवलीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये विक्री सुरू होती.
सिक्कीममधील गंगटोक येथील मूळ कंपनीच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तपास करत ठाण्यातील वागळे इस्टेट आणि डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा जप्त केला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मानवी आरोग्यास धोका निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करत पाच आरोपींना बेड्या ठोकत तपास सुरू केला.
-
नाशिक शहरात ‘हिट अँड रन’ चा थरार; घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिक शहरात ‘हिट अँड रन’चा थरार पहायला मिळाला. भरधाव चारचाकीची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक लागली. या घटनेत दुचाकीवरील दोघंजण गंभीर जखमी झाले. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील ही घटना आहे. घटनेनंतर CCTV व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका असणार आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या तीसहून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची प्रचार रणनिती ॲक्टिव्ह झाली आहे. शिवसेनेच्या प्रचार रणनितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक सभा होणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या तपोवन वृक्षतोडप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वकील नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी याचिका दाखल केली होती. वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेला न्यायालयात हजर राहण्यासाठी मागच्या तारखेला नोटीस बजावण्यात आली होती. यासोबतच इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Published On - Jan 27,2026 8:28 AM
