ई-पासपोर्टसाठी असा करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

12 मार्च  2026

ई-पासपोर्ट हे एक डिजीटल पासपोर्ट आहे. या पासपोर्टमधील इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये नाव, वय, फोटो इतर महत्त्वाची माहिती सुरक्षित असते.

ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी passport seva च्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर new passport application क्लिक करुन नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा आणि शुल्क जमा करा. 

त्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉइंटमेंट बुक करा. तिथे बायोमॅट्रिक आणि फोटो व्हेरीफीकेशन केलं जाईल. 

अपॉइंटमेंटच्या दिवशी कागदपत्र सोबत ठेवा. संबंधित अधिकारी बोटाचे ठसे, फोटो-इतर कागदपत्रांची डिजीटली नोंद करतील. त्यानंतर पडताळणीला सुरुवात होईल.

पासपोर्ट ऑफीसकडून अर्जदाराने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर पोलीस व्हेरीफिकेशननंतर अर्ज मंजूर होतो. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. 

व्हेरीफिकेशननंतर अर्जदाराच्या पत्त्यावर पासपोर्ट पाठवलं जातं. या ई-पासपोर्टमध्ये अर्जदाराची सर्व माहिती डिजीटली सेव्ह केलेली असते.

ई-पासपोर्ट साधारण पासपोर्टपेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने फार फायदेशीर आहे. चीपमुळे पासपोर्ट धारकाची पासपोर्ट न उघडता माहिती मिळते.